Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नियतीचा खेळ न्यारा! मुलाच्या तेरवीच्या कार्यक्रमात आईनेही सोडले प्राण; मग्न होती त्याच्या आठवणीत..

Pilot Rajveer Mother Dies at His Tehravi : जयपूरचे चौहान कुटुंब गेल्या काही दिवसांपासून अशा दुःखातून जात आहे, ज्याची कल्पना करणे शक्य नाही. यापूर्वी 15 जून रोजी केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांच्या घरातील आधार पायलट राजवीर सिंग चौहान यांचा मृत्यू झाला.

राजवीरच्या अकाली निधनाने कुटुंब आधीच हादरले होते, परंतु कदाचित नशिबाने त्यांची आणखी परीक्षा घेतली. मुलाच्या तेरवीच्या कार्यक्रमात जेव्हा पाटलट राजवीर यांच्या आई लक्ष्मी चौहान यांनी स्वतःच्या हातांनी त्याच्यासाठी शेवटचे जेवण बनवले, आणि मुलाच्या नावाने लोकांना जेऊ घालण्याच्या आधीच लक्ष्मी चौहान यांनी जगाचा निरोप घेतला. मुलाच्या आठवणीत त्या रडत असतानाच त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु तो पर्यंत त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pilot Rajveer

तिने स्वतःच्या हातांनी स्वयंपाक केला, अन्...

राजवीरचा मित्र सूरज म्हणाला की, विजय लक्ष्मी सकाळी लवकर उठली आणि तेरवीच्या कार्यक्रमासाठी व ब्राम्हण वृद्धांना जेऊ घालायचे म्हणून त्यांनी स्वत:च्या हाताने स्वयंपाक केला. त्यानंतर बिकानेरहून काही नातेवाईक आले, ज्यांना पाहून ती भावनिक झाली. ती तिच्या मुलाची आठवण करून जोरजोरात रडू लागली, त्यानंतर तिला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबातील सदस्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

शेजारी म्हणाले - आई तिच्या मुलाचे दुःख सहन करू शकली नाही

काही शेजाऱ्यांनी सांगितले की, विजय लक्ष्मी तिच्या लहान मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकली नाही. राजवीरच्या शेवटच्या प्रवासातही ती 'राजवीर अमर रहे' च्या घोषणा देत होती.

वारंवार तिच्या मुलाच्या चित्राला स्पर्श करून रडत होती. आता ती तिच्या मुलाकडे गेली आहे. शनिवारी संध्याकाळी चांदपोल स्मशानभूमीत तिचे अंतिम संस्कार करण्यात आले.

पायलट राजवीर यांनी 15 वर्षे सैन्यात सेवा बजावली!

39 वर्षीय राजवीर सिंह चौहान हे मूळचे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील महवा येथील रहिवासी होते. त्यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून 15 वर्षे सेवा बजावली.

निवृत्तीनंतर ते ऑक्टोबर 2024 मध्ये आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पायलट म्हणून रुजू झाले. ते जयपूरमधील शास्त्री नगर येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच ते जुळ्या मुलांचे पिता झाले होते.

पत्नीही लष्करात लेफ्टनंट कर्नल आहेत

राजवीर यांच्या पत्नी दीपिका चौहान देखील भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

हेलिकॉप्टर सुरक्षेबाबत बैठक

अपघातानंतर उत्तराखंड सरकारने सर्व संबंधित विभागांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. हेलिकॉप्टर ऑपरेशनशी संबंधित सर्व सुरक्षा प्रक्रियांचा आढावा घेतला जात आहे. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोपरि आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियम अधिक कडक केले जात आहेत असे सरकारचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+