प्रजासत्ताक दिनाबाबत या १० रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? परेडची वैशिष्ट्ये काय?
दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा रविवारी आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. १९५० साली भारताने संविधान स्विकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सुट्टी असण्यापलिकडे या दिवसाची अजूनही खूप वैशिष्ट्ये आहेत.

परेड असते आकर्षण
प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील परेड हे विशेष आकर्षण असते. या परेडची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. देशभरातली आणि परदेशातील भारतीयही हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. परेडची तयारीही पूर्ण झाली असून, ती पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विशेष गर्दी होणार आहे.
परेडची १० वैशिष्ट्ये
१. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो कारण, १९३० साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवशी पूर्ण स्वराज्याची घोषणेचा केली होती. याच दिवशी काँग्रेसने ब्रिटीशांकडे पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती.
२. प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी वर्षभर आधीच म्हणजे जुलैपासून सुरू होते. सहभागींना त्यांच्या सहभागाची माहिती दिली जाते आणि ते परेडच्या दिवशी पहाटे ३ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचतात. प्रजासत्ताक दिनापर्यंत त्यांचा सुमारे 600 तास सराव होतो. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल ड्रेस रिहर्सल 23 जानेवारीला झाली.
३. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला दरवर्षी प्रमुख अतिथींना निमंत्रीत केले जाते. यावर्षी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभोवो सुबियंतो यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
४. या परेडसाठी दरवर्षी एक थिम ठरवली जाते. परेडमध्ये सहभागी होणारी सर्व राज्ये आणि सरकारी कर्मचारी याच थिमचे पालन करतात. यावर्षी स्वर्णिम भारत- विरासत आणि विकास ही थीम ठरविण्यात आली आहे.
५. प्रजासत्ताक दिनात जेव्हा राष्ट्रगीत गायले जाते तेव्हा २१ तोफांची सलामी दिली जाते. विशेष म्हणजे या सगळ्या तोफांची सलामी राष्ट्रगीताच्या ५२ सेकंदाच्या आतच दिली जाते. म्हणजेच दर २.५ सेकंदाला एक तोफ उडवली जाते.
६. प्रजासत्ताक दिनाची परेड राष्ट्रपती भवनापासून निघून कर्तव पथवरुन इंडीया गेट आणि तेथून लाल किल्ल्यापर्यंत असते.
७. भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहण्यात मोलाची भूमिका बजावली.
८. प्रजासत्ताक दिनाचा पहिला कार्यक्रम १९५० साली मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर झाला होता. या पहिल्या परेडमध्ये १०० विमाने आणि तीन हजार सैनिक सहभागी झाले होते.
९. या दिवशी राष्ट्रीय विरता पुरस्कारही दिला जातो. ज्या बालकांनी साहस दाखवले त्यांचा या दिवशी सन्मान केला जातो.
१०. भारतातील सर्वाच्च नागरीक सन्मान असलेला पद्म पुरस्कार याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.












Click it and Unblock the Notifications