पावसाळा आणि पोटाचे विकार; नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या सविस्तर
देशात जवळपास सर्वदूर सध्या पाऊस सुरू झाला आहे. वातावरण ढगाळ आणि दमट या काळात राहते. अश्या परिस्थितीत अपचन आणि भूक कमी लागणे...पोटाचे अनेक विकार होत असतात. आता नेमकी याची काय कारण आहेत? आणि काय उपाय करावेत हेच जाणून घेऊयात.
पावसाळ्यात अनेक लोकांना अपचनाचा त्रास होतो. अनेकदा पावसाळ्यातील दूषित पाणी हे त्यामागचे कारण असावे असे वाटते. पण खरे कारण असते अग्निमांद्य! आता अग्निमांद्य म्हणजे काय ते समजून घेऊ.

अग्निमांद्य घडले म्हणजे पचन सामर्थ्यात विकृती निर्माण होते. व शरीरपोषणाची क्रिया मंदावते. विरुद्ध आहाराचे सेवन उदा. दूध-केळे, दूध-मांसाहार आदी. यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष विविध स्वरूपात दूषित होऊन जठराग्नी दूषित करतात व अग्निमांद्य उत्पन्न होते. त्यामुळे अपचन निर्माण होते.
पावसाळ्यातज्या थंडाव्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती वाढते, तो थंडावाच मुळात या उभय ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न असतो. हिवाळ्यातला थंडावा हा कोरडा असतो, तर पावसाळ्यातला ओला गारवासुद्धा त्वचेवरील सूक्ष्म रंध्रांचा संकोच करतो, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा काही प्रमाणात भूक वाढलेली दिसते.
परंतु ती हिवाळ्याप्रमाणे स्वस्थ भूक नसते. असे होते कारण पावसाळ्यातल्या त्या गारव्याला ओलाव्याची जोड असते. हवेतला ओलावा त्वचेची रंध्रे कोरड्या हवेप्रमाणे पूर्णतः संकोचू देत नाही, त्यामुळे भूक वाढल्यासारखी वाटते; मात्र व्यवस्थित लागत नाही आणि पावसाळ्यातच अनेकांना अपचनाचा त्रास होतो. अनेकदा पावसाळ्यातील दूषित पाणी हे त्यामागचे कारण असावे असे वाटते. पण खरे कारण असते अग्निमांद्य!
आयुर्वेदाला अपेक्षित अग्नी
अधिक नेमकेपणे सांगायचे तर सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाकणाचे पचन, त्यापासून ऊर्जेची वा शरीरपेशींची निर्मिती व तयार होणार्या त्याज्य घटकांचे उत्सर्जन या तीनही पातळ्यांवर ज्या अनेक जैव- रासायनिक क्रिया- प्रक्रिया घडून येतात, त्या सर्वांना मिळून आयुर्वेदाला अपेक्षित असलेली 'अग्नी' ही संकल्पना आहे. अग्नीची ही तीनही कार्ये पावसाळ्यामध्ये विकृत होतात, रुग्णांनाही तसाच अनुभव येतो.
मलावरोध किंवा आव पडणे
पावसाळयात कधी मलावरोधाचा त्रास तर कधीकधी मलप्रवृत्तीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
अशी घ्या काळजी
काविळसारखा आजार देखील या ऋतूमध्ये डोकं वर काढतो. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त गरम पाणी पिणे अत्यंत जरुरी आहे. त्याचबरोबर हलके आणि पचण्यास सुलभ असेच अन्न या दिवसांत खाणे अत्यंत जरुरी आहे. त्याचबरोबर भात, सूप, वरण, डाळ असे घटक जेवणात वाढवणे अत्यंत जरुरी आहे.












Click it and Unblock the Notifications