या पदार्थांचा जेवणात करा वापर; अनेक आजार होतील हद्दपार
बदलत्या जीवनशैली, धक्काधक्कीचे जीवन यात फिटनेस चांगला राखणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे.स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, कॅन्सर या आजारांचं प्रमाण वाढत आहे.

या सर्व आजारांचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आपणास भारतीय आहारपद्धती अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
शरीरासाठी काय उपयुक्त?
आपल्या देशातील पारंपारिक तृणधान्यं आणि भरडधान्य उपयोगाची आहेत. मिलेट हा प्राचीन धान्याचा एक प्रकार आहे. जो दोन प्रकारच्या धान्यांपासून बनविला जातो. अनेकांना मिलेट म्हटलं की बाजरीची आठवण येते. हा मिलेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. भारत, नायजेरिया मिलेटचा संबंध बाजरीचा असल्याचा आठवतो, जो मिलेट मध्ये सर्वात लोकप्रिय आहे. मिलेट हे भारतसह आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये याचं उत्पादन होतं.
उपयुक्त फळे-भाज्या कोणत्या?
बाजारात हंगामानुसार विविध फळांची, भाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. त्यांची विशिष्ट अशी चवही असते आणि फायदेही विशेष असतात. आपल्या पूर्वजांनी सांगितल्यानुसार हंगामानुसार येणारी फळे आणि भाजीपाला आहारात योग्य प्रमाणत वापरला पाहिजे.
हिमाचल प्रदेशातील बाबूगोशा फळात भरपूर प्रमाणात फायबर असतं. या फळामुळे शरीरातील पचनव्यवस्था सुरळीत राहते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. तसंच थकवाही दूर होतो. शिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर ठरतं.
भाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार या समस्या आपल्यापासून चार हात दूर राहतात.वांग्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कारले खायला आवडणार्यांची संख्या फारच कमी आहे. घरामध्ये कारल्याची भाजी म्हटले की, कोणालाही आनंद होत नाही. मात्र, हेच कारले खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कारल्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.अश्या प्रकारच्या आहार पद्धतीचा अवलंब करून आपण सुदृढ आरोग्य मिळवू शकतो.












Click it and Unblock the Notifications