धक्कादायक: भारताची अर्धी लोकसंख्या अनेक व्याधींनी ग्रस्त, लॅन्सेटचा अहवाल समोर
अलीकडच्या काळात बदललेले जीवनमान आणि त्यानुसार जडणाऱ्या अनेक व्याधी ही बाब जगभरातील लोकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. धावपळीचं आणि ताण-तणावाचे जीवन हे याच प्रमुख कारण मानलं जाते.
असे असले तरी भारतीयांच्या बाबतीत 'लॅन्सेट ग्लोबल' चा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये निम्म्याहून अधिक भारतीय अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे.

लॅन्सेटच्या अहवालात काय?
भारताच्या एकूण प्रौढ भारतीय लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या निरोगी नाही. यामध्ये 57 टक्के स्त्रिया आणि 42 टक्के पुरुष तंदुरुस्त नाहीत. विशेष म्हणजे या आकडेवारीत स्त्रियांची संख्या जास्त आहे. 2000 साली 22.3 टक्के भारतीय प्रौढ लोक निरोगी नव्हते तर 2022 मध्ये हा आकडा 49.4 टक्क्यापर्यंत वाढला आहे. अनेक तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
भारतातील आकडेवारी ही चिंतेची बाब
भारतातील आकडेवारी हा चिंतेचा विषय आहे, कारण भारतातील लोक इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी एक दशकपूर्वी हृदयाशी संबंधित आणि मधुमेहासारखे आजारांसाठी अनुवांशिकदृष्ट्या बळी पडतात. व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचाली कमी आणि संतुलित आहार न घेण्याचा हा परिणाम आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात होणारा बदलांचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, अशात निरोगी राहणे हे एक आव्हान आहे. असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
WHO ने नोंदवले मत
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढ वर्गातील लोकांनी कमीत कमी 150 ते 300 मिनिटे शारीरिक हालचाल करणारे व्यायाम करावेत. जर तुम्ही 150 मिनिटेसुद्धा शारीरिक हालचाल करणारे व्यायाम करत नाही आणि 75 मिनिटे तीव्र स्वरुपाचे व्यायाम करत नाही, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अशा प्रौढ लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह, स्मृतिभ्रंश, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगांचा धोका जास्त असतो.
महिला तंदुरुस्त नाहीत, चिंतेची बाब
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. फिओना बुल आणि इपिडेमियोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. टेसा स्ट्रेन सांगतात, "महिलांमध्ये शारीरिक व्यायाम किंवा हालचाल कमी होण्यामागील कारण म्हणजे त्यांचे घरातील कर्तव्ये. त्यांची इतरांप्रती काळजी घेण्याच्या भूमिकेमुळे ते अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतात.
त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही आणि यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवतो. ही बाब बदलणे गरजेचे आहे.
उपाय काय?
ताण: तणावाचे निरसन करणे गरजेचे आहे. विशेषतः शहरी भागात कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या लोकांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर काही वेळ व्यायाम, शेतीतील कामे , संतुलित आहार या बाबी देखील महत्वाच्या आहेत.












Click it and Unblock the Notifications