तुम्ही ते बटाटे समजून विष खात आहात का? असे बटाटे तुमचा जीव घेऊ शकतात

बटाटे ही एक अशी भाजी आहे, जी आपल्याला प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज मिळू शकते. बटाट्यापासून अनेक खाद्यपदार्थ सहज बनवता येतात. आणि ते लवकर खराब ही होत नाहीत. पण बटाटे जास्त काळ साठवून ठेवल्यास त्याला हिरवा रंग येतो. त्यामुळे या बट्यांना पुन्हा कोंब फुटायला लागतो. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. असेच बटाटे शिजवून खाल्ल्याने एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली होती.

खरं तर हिरवे आणि कोंब फुटलेले बटाटे काही काळानंतर विषारी होतात. जे आपल्या शरिरासाठी ठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हिरवे बटाटे खाल्ल्यानंतर अमेरिकेतील महिलेने हिरवे बटाटे शिजवून खाल्ले. त्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. किंबहुना त्या बटाट्यामध्ये असलेल्या सोलानाईन नावाच्या विषारी पदार्थाच्या रिॲक्शनमुळे तिची प्रकृती खराब झाली. हे काही ऍलर्जी असलेल्या लोकांमध्ये होऊ शकते.

potatoes

बटाट्यामध्ये सोलॅनिन काय असते?

दीर्घकाळ साठवलेल्या किंवा सूर्यप्रकाशात किंवा तापमानात ठेवलेल्या बटाट्यांमध्ये सोलानाईन नावाचा विषारी घटक तयार होतो. त्यामुळे बटाटे हिरवे होऊ लागतात. यामुळेच अशा प्रकारचे बटाटे खाण्यास आरोग्यास हानिकारक ठरतात. कारण कधी कधी या विषामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. असे बटाटे खाल्ल्यानंतर शरीरात विष पसरू लागते. परिणामी जुलाब,डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. बटाट्याचा हा प्रकार खाल्ल्यानंतर खाणाऱ्यांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते जर बटाट्याचा रंग हिरवा असेल तर शिजवण्यापूर्वी त्याचे हिरवे भाग कापून टाका किंवा असे बटाटे खाणे टाळा. - बटाटा पूर्णपणे हिरवा असेल तर त्याचा वापर टाळवा. बटाटे नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर गडद ठिकाणी साठवले पाहिजेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+