अतिसार झाल्यास मुलांना दूध देता येते का? मुलांना त्रास होत असल्यास काय खायला द्यावे, काय नाही? वाचा
पावसाळा आणि आरोग्याची समस्या हे समीकरणच आहे. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. पावसाळ्यात मुलांना अतिसाराचा धोका असतो, त्यामुळे काय आणि कशी काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊया.
पावसाळा म्हटलं की साथीचे रोग, डेंगू, मलेरिया,अतिसार हे आजार टाळता येत नाहीत. पावसाळ्यामध्ये लहान मुलांना अतिसाराचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता असते.. 6 महिन्यांनंतर मुलांमध्ये जुलाब ही एक सामान्य समस्या आहे.

कारण या वयानंतर मुलं आईच्या दुधासोबत वरवरच्या गोष्टी खायला लागतात. अतिसार ही एक सामान्य समस्या आहे जी बॅक्टेरिया विषाणू किंवा दूषित अन्न किंवा औषधांच्या सेवनामुळे उद्भवते. मात्र या आजारापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते.
अतिसार झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे या काळात आहाराकडे खूप लक्ष द्यावे लागते. जेव्हा मुलांना अतिसाराचा त्रास होतो, तेव्हा बहुतेक मातांना प्रश्न पडतो की, मुलांना अतिसाराचा त्रास होत असताना त्यांना काय खायला द्यावे आणि काय देऊ नये? अशा सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जाणून घेऊया सविस्तर माहिती...
मसालेदार अन्न खाणे टाळावे..
- अतिसार झाल्यास, मुलाला कधीही तेलकट आणि मसालेदार अन्न देऊ नये. यामुळे पचन बिघडू शकते तसेच जुलाब वाढू समस्या वाढू शकते
- चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते, ज्यामुळे डिहायड्रेशन वाढू शकते आणि अतिसार अधिक तीव्र होतो.
आंबट फळे टाळावी..
अतिसार झाल्यास संत्री, द्राक्षे आणि अननस यांसारखी आंबट फळे टाळावीत. यामध्ये उच्च आम्लता असते, ज्यामुळे अतिसार वाढू शकतो. केळी हे एकमेव फळ आहे जे अतिसारात खाऊ शकते कारण त्यात भरपूर पोटॅशियम असते.
भाज्या
जुलाब झाल्यास कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यासारख्या पालेभाज्या खाऊ नयेत. ते फायबरमध्ये समृद्ध आहेत ज्यामुळे अतिसार वाढू शकतो
काय खायला द्यावे?
जुलाब झाल्यास मुलांना फक्त हलका आहार द्यावा. त्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त भार पडत नाही आणि जुलाबही लवकर बरा होतो. त्यामूळे मुलांना भात - डाळ आणि दही देऊ शकतात
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा :
पावसाळ्यामध्ये मुलांना जर जास्त प्रमाणात अतिसार होत असेल तर घरगुती उपायाबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications