Health tips : सावधान! 'या' ५ व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये केळी; फायद्याऐवजी होऊ शकते मोठे नुकसान
Health tips who should avoid eating-bananas : केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत मानली जातात. यामध्ये व्हिटॅमिन-बी६, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. परंतु, प्रत्येकाच्या प्रकृतीला केळी मानवतातच असे नाही. काही आजारांमध्ये केळी खाल्ल्याने आरोग्याची स्थिती अधिक खालावू शकते. आहारतज्ज्ञ अबर्ना माथीवानन यांच्या सल्ल्यानुसार, खालील ५ प्रकारच्या व्यक्तींनी केळी खाताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
तसे पाहिले तर केळीचे अनेक फायदे आहेत, पण येथे केळी काही लोकांसाठी फारशी फायदेशीर ठऱत नाही उलट त्रासदायक ठरु शकते कुणी केळी टाळायला हवी याची माहिती आपण जाणून घेऊया.

केळी कुणी टाळायला हवी?
१. किडनीचे रुग्ण
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यांना किडनीचे जुने आजार (Chronic Kidney Disease) आहेत, त्यांच्यासाठी अतिरिक्त पोटॅशियम घातक ठरू शकते. किडनी निकामी असलेल्या रुग्णांना पोटॅशियम शरीराबाहेर टाकण्यास त्रास होतो, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
२. मधुमेही (डायबिटीज) रुग्ण
पिकलेल्या केळीमध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. याचे अतिसेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केळी खाऊ नयेत.
३. लठ्ठपणाने त्रस्त व्यक्ती
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर केळी तुमच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. केळीमध्ये कॅलरीज आणि शुगर जास्त असल्याने वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते.
४. सर्दी, खोकला आणि अस्थमा
केळीची तासीर 'थंड' असते. तसेच, केळी खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो. तुम्हाला आधीच सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास असेल, तर केळी खाल्ल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
५. ॲलर्जीची समस्या
काही लोकांना केळी खाल्ल्याने त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा सूज येणे यांसारखी ॲलर्जी होऊ शकते. अशा व्यक्तींनी केळीपासून दूर राहणेच हिताचे आहे.
(महत्त्वाची टीप: ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही आहारविषयक बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)












Click it and Unblock the Notifications