पावसाळ्यात मिळणारे हे फळ म्हणजे 'संजीवनी'च!
पावसाळ्यात दुषित पाणी, अन्नामुळे आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकार शक्तीवरही सर्वाधिक परिणाम होतो. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, क जीवनसत्व असलेली फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
म्हणूनच आरोग्यतज्ज्ञ, डाॅक्टर निरोगी राहण्यासाठी विशिष्ट हंगामात विशिष्ट फळे खायला सांगतात. पावसाळ्यातही एक विशिष्ट फळ खा असे आहारतज्ज्ञ आवार्जून सांगतात. हे फळ रोगप्रतिकार शक्तीसंपन्न असल्याने ते आरोग्यासाठी संजिवनीच ठरते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही हंगामी फळांचे सेवन केले पाहिजे. या काळात तुम्ही शक्य तितक्या हंगामी फळांचे सेवन करावे. यापैकी एक नाशपाती फळ आहे. पावसाळा म्हणजे नाशपातीचा ऋतू. मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.
नाशपाती पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्वाचे मानले जाते. क जीवनसत्वाशिवाय या फळात पोटॅशियम, फोलेट, कॉपर आणि मँगनीज. हे सर्व घटकपदार्थ आहेत ते शरीरासाठी आवश्यक असतात.
हे आहेत नाशपाती खाण्याचे ५ फायदे
हृदय रुग्णासाठी फायदेशीर: नाशपातीमध्ये पोटॅशियम असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ते खाल्ल्याने उच्च रक्तदाब (बी.पी.)
चा धोका कमी होतो.
वजन नियंत्रण: नाशपाती हे कमी कॅलरी असलेले फळ आहे. यामध्ये फायबर म प्रमाण चांगले असते जे अन्न पचण्यास मदत करते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे फळ
खाल्ल्याने भूक मंदावते आणि वजन वाढत नाही.
पचनसंस्थेला फायदेशीर: नाशपातीमध्ये एंजाइम असतात त्यामुळे पचन प्रक्रिया सुलभ होते आणि चांगली राहते. तसेच पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
मधुमेहासाठी फायदेशीरः रुग्णांनी नाशपाती खाणे आवश्यक आहे. नाशपातीमध्ये अँथोसायनिन्स आढळतात, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, त्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
वास्तविक, नाशपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेही रुग्णही ते खाऊ शकतात.
हाडांसाठी उत्तम: नाशपाती हाडांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात भरपूर कॅल्शियम असते. बोरॉन युक्त नाशपाती खाल्ल्याने कॅल्शियमचे शोषण आणि पीएच पातळी कायम राहते. हाडे कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी नाशपाती खा.












Click it and Unblock the Notifications