Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान! कोरोनाचा संसर्ग वाढतोय, 24 तासांत 5 जणांचा मृत्यू! देशातील निम्मे रुग्ण महाराष्ट्र केरळमध्ये

Corona Update in Marathi : भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 4,000 च्या पुढे गेली असून गेल्या 24 तासांत 5 कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे केरळ-महाराष्ट्र हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

कोविड-19 विषाणू भारतात डोके वर काढत असून या विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनत आहे. गेल्या 24 तासांत 5 मृत्यू झाले असतानाच 65 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2025 पासून कोरोनाचा नवीन प्रकार 37 रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनला आहे.

Corona Update in Marathi

सक्रिय रुग्णांची संख्या किती?

एकूण सक्रिय रुग्णांबद्दल बोललो तर ही संख्या सतत वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4,026 वर पोहोचली आहे. मे महिन्यापासून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. गेल्या 4 दिवसांत 31 मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर

देशात केरळ आणि महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना प्रभावित आहेत. देशातील एकुण रुग्णांपैकी जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1416 आहे. त्याच वेळी, मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात केरळपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण! (2 जूनपर्यंत राज्याची स्थिती)

दिल्ली

एकूण सक्रिय -393
24 तासांत 90 रुग्ण आढळले
एकूण मृत्यू - 4

कर्नाटक

एकूण सक्रिय - 311
24 तासांत 58 रुग्ण आढळले
एकूण मृत्यू - 4

केरळ

एकूण सक्रिय - 24 तासांत 1416 रुग्ण आढळले
24 तासांत 19
मृत्यू - 1
एकूण मृत्यू - 9

महाराष्ट्र

एकूण सक्रिय - 24 तासांत 12 रुग्ण आढळले
24 तासांत मृत्यू - 2
एकूण मृत्यू - 10

तामिळनाडू कोरोना केस अपडेट

एकूण सक्रिय - 215 रुग्ण
24 तासांत 26 आढळले -
24 तासांत मृत्यू - 1
एकूण मृत्यू - 3

चार दिवसांत 31 मृत्यू

अनेक राज्यांमध्ये कोविड पॉझिटिव्हिटी दर 15% पेक्षा जास्त आहे त्यामुळेदिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले की 'कोविडची पुढची लाट अजून संपलेली नाही' आणि न्यायालयाने केंद्र सरकारकडून नमुने आणि एसओपीचा सविस्तर अहवाल मागितला आहे. सरकारने नमुना संकलन आणि चाचणीची तयारी पूर्ण करावी असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, देश पूर्णपणे सतर्क आहे.

गेल्या लाटेत बांधलेले ऑक्सिजन प्लांट, आयसीयू बेड, आयसोलेशन वॉर्ड यांचा आढावा घेण्यात आला आहे. दिल्लीच्या आरएमएल आणि सफदरजंग रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत. आरएमएलमध्ये ९ बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+