चहल-धनश्रीचे नाते संपले; कोर्टात समोर आले घटस्फोटाचे 'हे' खरे कारण, वाचा संपूर्ण प्रकरण
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-यूट्यूबर धनश्री वर्मा यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. वृत्तानुसार या दोघांनी गुरुवारी (२० डिसेंबर) वांद्रे कुटुंब न्यायालयात कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या. गेल्या १८ महिन्यांपासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्री वर्मा यांनी आता अधिकृतपणे त्यांचे लग्न संपवले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आता पती-पत्नी राहिलेले नाहीत. वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर हे नाते कायमचे तुटले आहे.

किती वाजता झाली सुनावणी?
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वकिलाने सांगितले की, अंतिम सुनावणीसह कायदेशीर औपचारिकता गुरुवारी सकाळी ११:०० वाजता सुरू झाल्या. दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचे मान्य केल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. न्यायालयीन सत्रात चहल आणि वर्मा यांच्यासाठी ४५ मिनिटे चालणारे अनिवार्य समुपदेशन सत्रही समाविष्ट होते. हे सत्र संपल्यानंतर न्यायाधीशांनी चौकशी केली असता, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा त्यांचा हेतू असल्याचे मान्य केले. पुढील चौकशीत असे दिसून आले की दोघेही निर्णय घेण्यापूर्वी १८ महिन्यांपासून वेगळे राहत होते.
४ वर्षांचे नाते संपले
जेव्हा चहल आणि धनश्री यांना न्यायालयात त्यांच्या वेगळे होण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा दोघांनीही एकमेकांत सुसंगतपणा नाही हे मुख्य कारण सांगितले. त्यांचा विवाह संपवण्याचा अंतिम निर्णय न्यायाधीशांनी दुपारी ४:३० वाजता घेतला. ज्यामुळे त्यांना अधिकृतपणे त्यांच्या वैवाहिक बंधनातून कायमचे मुक्त करण्यात आले.
काय होते नेमके कारण?
या दोघांनी नाते तोडण्यासाठी सुसंगतपणा नाही, हे मुख्य कारण कोर्टाला सांगितले. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी एकमेकांसोबत व्यवस्थित राहात नाहीत, तेव्हा सुसंगतपणाची समस्या निर्माण होते. चहल आणि धनश्रीत सुसंगतपणा नव्हता. म्हणजेच या दोघांचेही स्वभाव एकमेकांना जुळणारे नव्हते. म्हणजेच दोघांचे विचार, आवडी किंवा जीवनशैली मिळती-जुळती नव्हती. ज्यामुळे त्यांना एकमेकांसोबत राहणे कठीण झाले होते.












Click it and Unblock the Notifications