Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'महिलांना भुताची नाही तर पुरुषांचीच जास्त भीती!, कोलकाता प्रकरणावरुन ट्विंकल खन्नाचे मोठे वक्तव्य

Twinkle Khanna on Kolkata Trainee Doctor Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. देशातील महिला कधी सुरक्षित होणार? हा प्रश्न सोशल मीडियावर देखील विचारला जात आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने महिलांच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे. ट्विंकल खन्ना प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असते. ती लेखिका आहे आणि त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दल बरेच काही बोलली आहे. ट्विंकलने कोलकाता प्रकरणानंतर आपली चिंता व्यक्त केली आहे. भारतातील महिलांना भूताची नाही तर पुरुषांची भीती वाटते, असे या मत तिने व्यक्त केले आहे.

Twinkle Khanna on Kolkata Trainee Doctor Rape Case

ट्विंकल खन्नाने टाइम्स ऑफ इंडियासाठी 'भूत भारतीय महिलांना का घाबरवत नाही' या शीर्षकाचा एक स्तंभ लिहिला होता. या स्तंभात तिने भारतातील महिलांप्रती असलेल्या मानसिकतेबद्दल सांगितले. अभिनेत्रीने लिहिले, आहे की 'या ग्रहावर पन्नास वर्षे झाली आहेत आणि मला असे दिसते की, आम्ही आमच्या मुलींना अजूनही त्याच गोष्टी शिकवत आहोत जे मला लहानपणी शिकवले होते. एकटे जाऊ नका. उद्यानात, शाळेत, कामावर एकटे जाऊ नका. असंच काही शिकवत आहोत.

ट्विंकल खन्नाने लेखात म्हटले आहे की, समाज आजही मुलींबाबत असाच विचार करतो. अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'कोणत्याही पुरुषासोबत एकटे जाऊ नका, मग तो तुमचा काका, चुलत भाऊ किंवा मित्र असला तरीही. सकाळी किंवा संध्याकाळी एकटे जाऊ नका, विशेषतः रात्री तर आजिबात नाही. एकटे जाऊ नका कारण असंही होऊ शकते की, तू कधीच परत येणार नाहीस.

महिलांच्या सुरक्षेसाठी आता कडक कायदेशीर नियम बनवायला हवेत, यावर ट्विंकल खन्नाने भर दिला आहे. तिने म्हटले आहे की, ' मला वाटते की या देशातील स्त्रियांना पुरुषापेक्षा अंधाऱ्या गल्लीत भूताचा सामना करणे अधिक सुरक्षित आहे.' याशिवाय अभिनेत्रीने श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' या चित्रपटाचाही उल्लेख केला आणि त्याचा संबंध महिलांच्या सुरक्षेशी जोडला.

ट्विंकल खन्ना म्हटले आहे की, , 'आधीच उल्लेख केलेल्या 'स्त्री 2' सारखा भयपट देखील महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यासाठी एक मनोरंजक मार्ग असू शकतो. जे आता संपूर्ण भयानक जगात बदलत आहे. स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि राजकुमार राव मुख्य हे मुख्य भूमिकेत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+