दिशा सालियन कोण होती? मृत्यूच्या 5 वर्षांनी पुन्हा प्रकरण आलं चर्चेत
Who Was Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी जून 2020 मध्ये दिशाच्या मृत्यूच्या गूढ परिस्थितीत नव्याने चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांचेही नाव समोर आले आहे.
दिशाच्या वडीलांनी याचिकेत आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीमुळे सत्ताधारी विरोधाकांमध्ये आरोप-प्रत्योरापाच्या फैरी आता सुरु झाल्या आहेत.

दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला. वृत्तानुसार ती मुंबईतील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली. बरोबर सहा दिवसांनी 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी समोर आली. दरम्यान आता या दोन्ही मृत्यूंना पाच वर्षांनी दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दिशाच्या वडिलांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्धही एफआयआर दाखल केला आहे.
दिशा सालियन कोण होती?
दिशा सलियनने सुशांत सिंग राजपूतसोबत खूप जवळून काम केले होते. याशिवाय ती भारती सिंग आणि वरुण शर्माची मॅनेजर देखील होती. त्याच वेळी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने 2020 मध्ये चौकशीदरम्यान दिशाबद्दल एक विधान केले होते. जेव्हा रिया चक्रवर्तीला विचारण्यात आले की, ती दिशाला कशी भेटली तेव्हा तिने सांगितले की, ती सुशांतच्या माध्यमातून दिशाला भेटली. तिने सांगितले की, सुशांतच्या घरी गेल्यावर एका औपचारिक भेटीत तिची दिशाशी भेट झाली आणि दिशा तिच्या टीमसह तिथे आधीच उपस्थित होती.
आता दिशा सालियनच्या वडिलांच्या जबाबानंतर या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी केली जाईल. वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर ती एक सुनियोजित कट होता. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात.
मंत्री नितेश राणे यांचे गंभीर आरोप
गुरुवारी माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, आमचे आमदार अमित साटम यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. दिशा सालियनला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत तीन जणांची नावे आहेत. हे गांभीर्याने घेतले पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे. दिशा सालियनच्या वडिलांना खात्री आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी.
दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, जर आदित्य ठाकरेंनी काही केले नाही तर ते का पळून जात आहेत, त्यांनी त्याचा सामना करावा. आदित्य ठाकरे कुठे आहेत? तो काल रात्रीपासून का उत्तर देत नाहीये? तो जनतेसमोर का येत नाहीये? चौकशी पूर्ण होईपर्यंत आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर आमदारपदाचा राजीनामा द्यावा. सत्य बाहेर येऊ द्या. जर तो निर्दोष आढळला तर मी महाराष्ट्राची माफी मागण्यास तयार आहे, असेही राणेंनी जाहीर केले.












Click it and Unblock the Notifications