विराट-अनुष्का पुन्हा वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या चरणी; अनुष्का म्हणाली-"आम्ही तुमचे आहोत...
Virat Kohli vs Anushka Sharma News : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवारी पुन्हा एकदा वृंदावन गाठत आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतला. वृंदावनातील 'केली कुंज' आश्रमात त्यांनी प्रख्यात संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या एकाच वर्षातील त्यांची ही तिसरी भेट असल्याने या जोडप्याची महाराजांवरील श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
श्रद्धेने नतमस्तक झाले 'विरुष्का'
आश्रमात पोहोचल्यानंतर विराट आणि अनुष्का अत्यंत साध्या वेशात पाहायला मिळाले. दोघांनीही प्रेमानंद महाराजांसमोर गुडघे टेकून त्यांना साष्टांग नमस्कार केला. कपाळावर टिळक आणि गळ्यात तुळशीची माळ धारण केलेला विराट, महाराजजींचे प्रवचन अत्यंत मनापासून आणि स्मितहास्य करत ऐकताना दिसला.

अनुष्काचे भावूक उद्गार आणि महाराजांचा संदेश
या भेटीदरम्यान अनुष्का शर्मा कमालीची भावूक झाली होती. तिने हात जोडून महाराजांना म्हटले, "महाराजजी, आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात." यावर महाराजजींनी हसत दाद दिली आणि सर्वांना जीवनाचे सार सांगितले.
जो ईश्वर में श्रद्धा रखता है, जो धर्म में विश्वास रखता है, ईश्वर भी उसे सफलता से ज्यादा दूर नहीं रखते!❤️
— Ocean Jain (@ocjain4) December 16, 2025
विराट और अनुष्का आज फिर से पूज्य महाराज प्रेमानंद जी के दरबार में..!! pic.twitter.com/tQnfyPZngp
महाराजजींनी दिलेली काही अमूल्य शिकवण
भगवंताची सेवा
"आपल्या कामालाच देवाची सेवा समजा. जीवनात नेहमी गंभीर आणि नम्र राहा. जोपर्यंत ईश्वर प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपला प्रवास थांबणार नाही," असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
खरा मालक कोण?
"या संसाराच्या भ्रमात आपण असंख्य जन्म वाया घालवले आहेत. आता ज्याने आपल्याला निर्माण केले, त्या खऱ्या पित्याकडे म्हणजेच ठाकूरजींकडे (देवाकडे) पाहण्याची तळमळ ठेवा."
आध्यात्मिक साखळी
महाराज म्हणाले, "आपण सर्व एकाच छत्राखाली आहोत. गुरु, आचार्य आणि देवता आपली साथ देतात, म्हणूनच आपण या प्रवासात सुरक्षित आहोत."
रामायणाचे उदाहरण आणि बुद्धीचे महत्त्व!
प्रेमानंद महाराजांनी रामायणातील रावणाचे उदाहरण देत विराट-अनुष्काला सावध केले. ते म्हणाले, "रावणाकडे सर्व काही होते-वैभव, संपत्ती आणि शक्ती; पण त्याच्याकडे योग्य बुद्धीचा अभाव होता. देवापासून दूर गेल्यामुळेच त्याचा पतन झाला." म्हणूनच माणसाने नेहमी देवाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आध्यात्मिक ओढ!
गेल्या काही काळापासून विराट कोहलीच्या स्वभावात आणि खेळात एक प्रकारचा संयम दिसून येत आहे, ज्याचे श्रेय तो अनेकदा त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला देतो. या वर्षातील तिसऱ्या भेटीने हे स्पष्ट झाले आहे की, प्रसिद्धीच्या झगमगाटातही हे जोडपे आपल्या मुळांशी आणि श्रद्धेशी घट्ट जोडलेले आहे.












Click it and Unblock the Notifications