"तू कसला वडील?, तुम्ही मूर्ख आहेस!"; सुनीता आहुजांचे गोविंदाबद्दल खळबळजनक विधान, मुलावरून तोफ..
Sunita Ahuja's Explosive Viral Remarks on Govinda : बॉलिवूडचा 'नंबर 1' अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे जोडपे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. घटस्फोटाच्या अफवा आणि कथित विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांदरम्यान, सुनीता आहुजा यांनी एका ताज्या मुलाखतीत गोविंदाबद्दल अत्यंत कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

"तू ६३ वर्षांचा आहेस, आता तरी शहाणपणा दाखव!"
'मिस मालिनी'सोबतच्या एका पॉडकास्ट प्रोमोमध्ये सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या कथित अफेअर्सचा उपहास करत त्यांना धारेवर धरले. सुनीता म्हणाल्या, "अशा अनेक मुली आहेत, पण तू थोडा मूर्ख आहेस. तू आता ६३ वर्षांचा आहेस. या वयात तुला तुझी मुलगी टीनाचे लग्न लावून देणे आणि मुलगा यशवर्धनच्या करिअरची काळजी करणे आवश्यक आहे."
सुनीता यांनी पुढे स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, त्या गोविंदाला या गोष्टींसाठी सहजासहजी माफ करणार नाहीत. "आता तरी काळजी घे बेटा," असे म्हणत त्यांनी गोविंदाला खडे बोल सुनावले आहेत.
मुलाच्या करिअरवरून गोविंदावर ओढले ताशेरे
या मुलाखतीतील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे मुलगा यशवर्धन आहुजा याच्या करिअरबद्दलचा होता. यशवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी धडपडत असला तरी, त्याला स्वतःच्या वडिलांकडून कोणताही पाठिंबा मिळत नसल्याचे सुनीता यांनी सांगितले.
त्या संतापून म्हणाल्या, "गोविंदाचा मुलगा असूनही त्याने कधी 'बाबा मला मदत करा' असे म्हटले नाही आणि त्याचे वडील गोविंदानेही कधी पुढाकार घेतला नाही. मी गोविंदाला त्याच्या तोंडावर विचारले आहे की, 'तू वडील आहेस की काय?'" स्वतःच्या मुलाच्या भविष्याबाबत गोविंदा उदासीन असल्याचा आरोप सुनीता यांनी थेटपणे केला आहे.
घटस्फोटाच्या अफवा आणि सत्य
गेल्या वर्षभरापासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. २०२५ च्या गणेशोत्सवादरम्यान सुनीता यांनी या बातम्यांना अफवा ठरवत मीडियाला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, "जर काही वाद असता तर आम्ही इतके जवळ उभे राहिलो असतो का? माझा गोविंदा फक्त माझा आहे." मात्र, ताज्या मुलाखतीतील त्यांची आक्रमक भूमिका पाहता, त्यांच्या नात्यात पडलेली दरी स्पष्टपणे जाणवत आहे.
१९८७ पासूनचा प्रवास
गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ मध्ये गुपचूप लग्न केले होते. १९८९ मध्ये मुलगी टीना हिच्या जन्मापर्यंत त्यांनी आपले लग्न जगापासून लपवून ठेवले होते. अनेक दशके हे बॉलिवूडमधील सर्वात 'पॉवर कपल' मानले जात होते. मात्र, गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा आणि मुलाच्या करिअरवरून सुरू असलेल्या वादाने या सुखी संसाराला गालबोट लावले आहे.












Click it and Unblock the Notifications