VIDEO : मॅच रद्द झाल्यानंतर प्रीती झिंटाने केले असे काही, आता व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. या दोन्ही देशांमधील लष्करी तणावामुळे, धर्मशाळेतील आयपीएल सामना मध्येच थांबवण्यात आला आणि खेळाडूंना सुरक्षितपणे दिल्लीला आणण्यात आले. जम्मू आणि चंदीगडहून विमान सेवा बंद असल्याने खेळाडूंना वंदे भारत या विशेष ट्रेनने दिल्लीला नेण्यात आले.

खेळाडू विशेष ट्रेनने दिल्लीला आले
या विशेष ट्रेनमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त त्यांचे कुटुंबीय, आयपीएल अधिकारी आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटा देखील उपस्थित होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता ही ट्रेन सफदरजंग रेल्वे स्टेशनवर पोहोचली. या ट्रेनमध्ये पंजाब किंग्जचा श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्को जानसेन यांच्याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सचा केएल राहुल, अक्षर पटेल, फाफ डू प्लेसिससारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते.
प्रीती झिंटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
दरम्यान, प्रीती झिंटाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना रद्द झाल्यानंतर पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटा आणि आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल यांनी चाहत्यांना स्टेडियम सोडण्याचे आवाहन केले. सुरक्षेच्या कारणास्तव आणि हवाई हल्ल्याच्या सायरनमुळे सामना रद्द करण्यात आला, त्यानंतर प्रीती झिंटा आणि धुमल यांनी चाहत्यांच्या सुरक्षेला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिले.
Preity Zinta and Arun Dhumal direct everyone to evacuate the stadium as soon as possible.#IndiaPakistanWar #IPL2025
— Faruk🐦 (@uf2151593) May 9, 2025
#THEIPL #iplsuspended #IndianArmedForces #IndoPakWar #karachiport #IndianNavy
pic.twitter.com/uhEKO4FHtt
चाहत्यांकडून प्रीतीचे कौतुक
प्रीती झिंटाची ही कृती पाहून चाहते सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक करत आहेत. सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांना स्टेडियम सोडण्याची विनंती करताना प्रीती झिंटाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठे पाऊल उचलत आयपीएलचा २०२५ चा हंगाम स्थगित केला आहे.
आयपीएलचे 16 सामने राहीले
आयपीएल स्पर्धाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.त्यामुळे आयपीएलचे नियोजित सामने होणार नाहीत. आयपीएल सुरु झाल्यापासून काल 8 मेपर्यंत 58 सामने पार पडले आहेत. सध्या या स्पर्धेतील 16 सामने खेळणे बाकी आहे, साखळी स्पर्धेत प्रत्येक संघाला तेरा सामने खेळायचे असून बहुतांश संघांचे 10 ते 12 सामने पुर्ण झाले आहेत. प्लेऑफमध्ये अंतीम 4 संघात चुरस असताना हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
पुन्हा कधी होऊ शकतात आयपीएलचे सामने?
आयपीएल सिरीजनंतर भारतीय संघ इंग्लड दोऱ्यावर जाणार आहे. रिपोर्टनुसार भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावरुन परत आल्यानंतर पुन्हा आयपीएलचे उर्वरित सामने खेळले जाऊ शकतात. आम्ही सांगतो की, टीम इंडिया 1 जून 2025 ते 31 जूलै 2025 दरम्यान इंग्लंडचा दौरा करत आहे , त्यात उभय संघात 5 कसोटी सामने होणार आहेत.












Click it and Unblock the Notifications