'हिनेच भावाच्या संसारचं वाटूळ केलं', ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान श्वेताचे विधान
Shweta Bachchan Old Interview : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. हे जोडपे एकत्र नसून वेगळे राहत असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघे क्वचितच एकत्र दिसतात. अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये या जोडप्याला वेगळं पाहिल्यावर या बातम्यांना अधिकच खतपाणी मिळालं. मात्र आता श्वेता बच्चनची एक क्लिप समोर आली आहे, जी पाहिल्यानंतर लोकांना अभिषेक ऐश्वर्याचा घटस्फोटाच्या बातम्यांवर विश्वास बसत आहे.
श्वेता बच्चनचा एक ऑडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये तिने अनेक गोष्टी उघडपणे बोलल्या आहेत. ऐश्वर्या राय एक यशस्वी अभिनेत्री आहे असं मला वाटत नाही, असं श्वेताने म्हटलं आहे. तिने हे कधी आणि कुठे म्हटंल आहे ते जाणून घेऊया.
खरंतर श्वेता बच्चन एकदा कॉफी विथ करणमध्ये पोहोचली होती. इथे तिला रॅपिड फायर राउंडमध्ये विचारण्यात आलं की,अभिषेक ऐश्वर्या यांच्यापैकी चांगला अभिनेता कोण? तिने क्षणाचाही विलंब न लावता अभिषेक असं उत्तर दिलं. यानंतर विचारण्यात आलं की, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात सर्वात कठोर पालक कोण, यावरही श्वेताने ऐश्वर्याचं नाव घेतलं. यानंतर विचारण्यात आलं की, अभिषेकला सर्वात जास्त कोणाची भीती वाटते? आई जया बच्चन यांचे नाव घेता श्वेता बच्चन लगेच पत्नी म्हणाली.

श्वेताची ही क्लिप सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर नेटक-यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटक-याने लिहिले की, तुम्ही टिपिकल भारतीय सीरियलमधील ननंद आहात. एकाने म्हटलं आहे की, या मुलीनेच त्यांच्या संसारचं वाटूळ केल्याची खात्री झाली.
श्वेता बच्चनमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील संबंध बिघडले आहेत या गोष्टी नेहमीच उपस्थित केल्या जातात. मात्र, अनेकजण यामागे जया बच्चन यांनाही कारणीभूत मानतात. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात असे काही विशेष बाँडिंग नाही आणि कदाचित यामुळेच पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आला आहे.












Click it and Unblock the Notifications