Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"ऐश्वर्या आणि सलमानमध्ये खूप प्रेम होतं, ते का वेगळे झाले?; बड्या संगीत दिग्दर्शकाने केला खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याशी असलेल्या त्यांच्या तणावपूर्ण संबंधांवर भाष्य केले आहे. याचदरम्यान, त्यांनी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात चर्चित असलेल्या जोडप्यांपैकी एक असलेल्या सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दलही मोठे आणि भावनिक विधान केले आहे.

aishwarya rai salman khan love breakup

"ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते"

विकी लालवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत, जबार यांना विचारण्यात आले की, 'देवदास' चित्रपटात सलमानला ऐश्वर्यासोबतच्या पूर्वीच्या नात्यामुळे कास्ट केले गेले नाही का? यावर उत्तर देताना दरबार यांनी दोघांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले.

दरबार म्हणाले, "हे सर्व मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. आम्हाला मीडियाद्वारेच कळले. ते इतके चांगले मित्र होते, ते एकमेकांवर इतके प्रेम करत होते. मग ते का भांडत होते? याचे आम्हाला वाईट वाटले."

ते पुढे म्हणाले, "ऐश्वर्या राय खूप चांगली आहे आणि सलमान खूप चांगला माणूस आहे. त्या दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटले. जेव्हा ते भांडले, तेव्हा आम्हाला वाईट वाटले. नंतर हळूहळू ते वेगळे झाले. आजही आम्हाला खूप वाईट वाटते. आता, त्या जुन्या गोष्टी पुन्हा सांगण्याची गरज नाही." दरबार यांनी स्पष्ट केले की, आता ऐश्वर्या दुसऱ्याची पत्नी आहे आणि सलमान स्वतः कधीही त्याबद्दल बोलत नाही, कारण तो खूप हुशार आहे.

भन्साळी आणि सलमानमध्ये संबंध का बिघडले?

इस्माईल दरबार यांनी या मुलाखतीत भन्साळींसोबतचे त्यांचे बिघडलेले संबंध आणि सलमान-भन्साळी यांच्यातील वादावरही भाष्य केले. एकेकाळी भन्साळी आणि दरबार यांनी एकत्र 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते.

दरबार यांच्या मते, भन्साळी यांनी 'देवदास'मध्ये शाहरुख खानला कास्ट केल्यामुळेच सलमान आणि भन्साळी यांच्यात दुरावा आला. सलमानने भन्साळींच्या फ्लॉप ठरलेल्या 'खामोशी' चित्रपटालाही पाठिंबा दिला होता. "हे स्पष्ट आहे की जर मी तुम्हाला दोनदा मदत केली आणि तिसऱ्यांदा तुम्ही माझ्या प्रतिस्पर्ध्याला चित्रपटात कास्ट केले तर मला वाईट वाटेल."

'मी भन्साळींच्या ऑफिसमधून अपमानित होऊन बाहेर पडलो'

दरबार यांनी त्यांच्या आणि भन्साळी यांच्या नात्यातील दुरावा वाढण्यामागचे मुख्य कारणही उघड केले. त्यांचे म्हणणे आहे की, भन्साळी आता गर्विष्ठ झाले आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्यासोबत काम करणार नाहीत, अगदी १०० कोटी रुपयांची ऑफर मिळाली तरीही नाही.

एका मीडिया रिपोर्टनुसार, भन्साळींच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या गाण्याच्या संगीतावरून त्यांच्या नात्यात दुरावा आला. भन्साळींना वाटले की दरबार यांनी ही बातमी पसरवली आहे.

त्यानंतर भन्साळींनी त्यांना कार्यालयात बोलावून चौकशी केली, ज्यामुळे दरबार यांना अपमानित वाटले. "मी 'हीरामंडी' स्वतःहून सोडला कारण मला वाटले की ते मला काढून टाकणार आहे," असे त्यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+