Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Manoj Kumar Death:जेव्हा लाल बहादूर शास्त्रींच्या विनंतीवरुन मनोज कुमारांनी सिनेमा बनवला वाचा किस्सा

Manoj Kuma's Death : भारताची कहाणी जगाला सांगणाऱ्या महान कलाकार मनोज कुमार यांचे निधन झाले. आज 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त आले. मनोज कुमार यांनी देशप्रेम कसे असते हे त्यांच्या चित्रपटातून त्यांनी शिकवले. संयुक्त भारतातील लाहोरमध्ये जन्म झाल्यानंतर ते शरणागत म्हणून भारतात आले आणि सुपरस्टार बनले.

भारत पाकिस्तान फाळणी आणि स्वातंत्र्य याचा त्यांच्याशी अगदी जवळून संबंध आला. ते स्वःत लाहोरमधून स्थलांतरीत म्हणून भारतात आले होते. त्यामुळे त्यांचे देशप्रेम किती असेल हे सांगायला नको. मनोज कुमार सिनेक्षेत्रात क्षितीजावर होते तेव्हा त्यांचे देशप्रेम आणि देशाची गरज म्हणून तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी चित्रपट बनवायला सांगितला होता, मनोज कुमार यांनीही तो तितक्याच ताकदीने बनवला आणि तोच चित्रपट आजही देशप्रेमाचे धडे, शेतकऱ्यांविषयी आस्था काय असते हे दाखवतो. जाणून घेऊया..तो कोणता चित्रपट आहे आणि काय आहे तो किस्सा...

Manoj Kumar Death

भारत पाकिस्तान युद्ध आणि देशात संकट

1965 मध्ये भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले. युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळी देश फार संरक्षण आणि आर्थिक तसेच अन्नधान्याच्या दृष्टीने सक्षम नव्हता. देशात गरीबी कायम होती अशा स्थितीत युद्ध झेलण्याची वेळ भारतावर आली. तेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते ते डगमगले नाहीत, त्यांनी पाकिस्तानशी दोन हात केले. देशातील लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्याची आणि अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्व सांगण्याची गरज होती तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी अभिनेते मनोज कुमार यांना या विषयावर चित्रपट बनवण्याची विनंती केली होती.

उपकारची निर्मिती, जय जवान जय किसानचा नारा

दिग्दर्शक म्हणून मनोज कुमारचा पहिला चित्रपट उपकार होता, ज्यामध्ये गाणे होते, ते म्हणजे "मेरे देश की धरती..." विशेष म्हणजे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विनंतीवरून आणि त्यांच्या 'जय जवान जय किसान'च्या आवाहनावर मनोज कुमार यांनी हा चित्रपट बनवला आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित, उपकार हा खेड्यातील जीवनावर आणि भारतातील शेतकरी आणि सैनिकांच्या योगदानावर आधारित चित्रपट आहे. उपकारचे खूप कौतुक झाले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट गाण्याचे फिल्मफेअर पुरस्कार जिंकले.

काय म्हणाले होते मनोज कुमार?

मनोज कुमार एका मुलाखतीत म्हणाले होते, "दिग्दर्शक होण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. मी तेव्हा दिग्दर्शक झालो जेव्हा मला शहीद चित्रपटादरम्यान अनौपचारिकपणे चित्रपटाचे दिग्दर्शन करावे लागले होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला. अशा प्रकारे मी उपकार हा चित्रपट बनवला." दरम्यान हा चित्रपटाने देशात गारुड निर्माण केले लोकांनी हा चित्रपट आणि मनोज कुमार यांनी डोक्यावर घेतले होते.

मनोज कुमार यांच्या चित्रपटाची यादी (List of Manoj Kumar's films)

  • 1995 मैदान-ए-जंग
  • 1989 क्लर्क
  • 1989 देशवासी
  • 1989 संतोष
  • 1987 कलयुग और रामायण
  • 1981 क्रांति
  • 1979 जाट पंजाबी
  • 1977 शिरडी के साईं बाबा
  • 1977 अमानत
  • 1976 दस नम्बरी
  • 1975 सन्यासी
  • 1974 रोटी कपड़ा और मकान
  • 1972 बेईमान
  • 1972 शोर
  • 1970 मेरा नाम जोकर
  • 1970 पूरब और पश्चिम
  • 1970 यादगार
  • 1970 पहचान
  • 1969 साजन
  • 1968 नीलकमल
  • 1968 आदमी
  • 1967 अनीता
  • 1967 उपकार
  • 1967 पत्थर के सनम
  • 1966 दो बदन
  • 1966 पिकनिक
  • 1966 सावन की घटा
  • 1965 हिमालय की गोद में
  • 1965 पूनम की रात
  • 1965 शहीद
  • 1965 बेदाग
  • 1965 गुमनाम
  • 1964 वो कौन थी
  • 1964 अपने हुए पराये
  • 1964 फूलों की सेज
  • 1963 घर बसा के देखो
  • 1963 गृहस्थी
  • 1962 हरियाली और रास्ता
  • 1962 माँ बेटा
  • 1962 अपना बना के देखो
  • 1962 बनारसी ठग
  • 1962 डॉक्टर विद्या
  • 1962 नकली नवाब
  • 1962 शादी
  • 1961 सुहाग सिन्दूर
  • 1961 काँच की गुड़िया
  • 1961 रेशमी रूमाल
  • 1960 हनीमून
  • 1958 पंचायत
  • 1958 सहारा
  • 1957 फैशन

लेखक म्हणून चित्रपट

  • 1999 जय हिन्द
  • 1989 क्लर्क
  • 1987 कलयुग और रामायण
  • 1981 क्रांति
  • 1974 रोटी कपड़ा और मकान
  • 1972 शोर
  • 1970 मेरा नाम जोकर
  • 1970 पूरब और पश्चिम
  • 1970 यादगार
  • 1967 उपकार

निर्माता म्हणून केलेले चित्रपट

  • 1999 जय हिन्द
  • 1989 क्लर्क
  • 1983 पेंटर बाबू
  • 1981 क्रांति
  • 1974 रोटी कपड़ा और मकान
  • 1972 शोर
  • 1970 पूरब और पश्चिम

निर्देशक म्हणून केलेले चित्रपट

  • 1999 जय हिन्द
  • 1989 क्लर्क
  • 1981 क्रांति
  • 1974 रोटी कपड़ा और मकान
  • 1972 शोर
  • 1970 पूरब और पश्चिम
  • 1967 उपकार
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+