मुस्लिमांविषयी प्रेम आहे, पाकिस्तानातून पत्रं यायची, ममता कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेली ममता कुलकर्णी आता आध्यात्मिक जीवन जगत आहे. संन्यास स्वीकारून ती साध्वी झाली असून, काही काळासाठी तिने महामंडलेश्वर पदही भूषवले होते. मात्र किन्नर आखाड्यात झालेल्या वादामुळे तिने ते पद सोडले. नंतर पुन्हा तिने महामंडलेश्वर पद स्वीकारले आणि सध्या ती विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

Mamata Kulkarni statement

"मुस्लिम समाजाने मला खूप प्रेम दिलं"

अलीकडेच दिल्लीत एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना ममता कुलकर्णीने मुस्लिम समुदायाविषयी प्रेम व्यक्त करत एक स्पष्ट भूमिका मांडली. ती म्हणाली, "मुस्लिमांविषयी माझ्या मनात खूप आदर आणि प्रेम आहे. दुबईमध्ये मी 25 वर्षे अध्यात्मिक साधना केली आणि तिथे मला खूप आत्मिक समाधान आणि प्रेम मिळालं."

पाकिस्तानातून येणाऱ्या पत्रांची आठवण

ममताने आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या काळातील एक आठवण सांगताना म्हटलं, "जेव्हा मी बॉलिवूडमध्ये सक्रिय होते, त्या काळात मला पाकिस्तानमधून रोज सुमारे 50 पत्रं यायची. त्यामुळे त्या काळातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं, हे मी विसरू शकत नाही."

"दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही"

मुस्लिम समाजाबद्दल प्रेम व्यक्त करत असतानाच ममताने दहशतवाद्यांविषयी आपली भूमिका ठामपणे मांडली. "माझं प्रेम मुस्लिम समाजासाठी आहे, पण दहशतवाद्यांविषयी अजिबात सहानुभूती नाही. त्यांचं समर्थन मी कधीही करू शकत नाही," असं ती म्हणाली.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ममताचं वक्तव्य चर्चेत

सध्या भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणावाचे वातावरण आहे. जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशा पार्श्वभूमीवर ममताचं वक्तव्य विशेषतः लक्ष वेधून घेत आहे.

आध्यात्माच्या मार्गावर असली तरी ममता कुलकर्णीचं प्रत्येक विधान आजही चर्चेचा विषय ठरतं आहे. आता तिच्या या वक्तव्यावर समाज आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+