अबब... 10 हजार साड्या,28 किलो सोनं, 800 किलो चांदी, 'ही' अभिनेत्री आहे आत्तापर्यंतची सर्वात श्रीमंत
Jayalalithaa the richest actress in India : देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण..? असा प्रश्न जर विचारला. तर तुम्ही बराच विचार कराल. कुणी म्हणेल ऐश्वर्या, कुणी म्हणेल माधुरी... पण नाही, तुम्ही चुकताय. देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कुणी वेगळीच आहे. विशेष म्हणजे त्या अभिनेत्रीकडे आहे तब्बल पाच हजार कोटींची संपत्ती. हिंदीत आत्तापर्यंत जुही चावलाला सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हटलं जात होतं. तिचं नेटवर्थ एक हजार कोटींच्या आसपास आहे. हिंदीत कोणत्याही अभिनेत्रीची संपत्ती जुही चावला एवढी नाही. पण देशाचा विचार केला तर जुही चावलापेक्षा पाच पट श्रीमंत अभिनेत्रीही आहे. हे सांगतली तर तुमचा विश्वास बसणार नाही...
कोण आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री
देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे, जयललिता. होय, जयललीता. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून जयललीता अभिनय क्षेत्रात आहेत. जयललिता तमिळ आणि तेलुगू सिनेमाची टॉप स्टार होती. बॉलिवूडमध्येही जयललिता यांनी अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. एमजीआर यांना जयललिता गुरू मानायच्या. एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी जवळपास 28 चित्रपट केले होते.

10 हजार गाड्या, सोनं-चांदी आणि बरंच काही
जयललिता जेव्हा चित्रपटात काम करायच्या त्यावेळी त्या सर्वात महागड्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र जयललिता यांनी चित्रपटातून जेवढे पैसे कमवले त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांनी राजकारण कमवले. त्यांच्याकडे अनेक महागड्या साड्या आणि बूट होते. सीबीआयनं ज्यावेळी जयललिता यांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांच्या घरातून 10 हजार साड्या आणि 28 किलो सोनं सापडलं होतं. या छापेमारीत त्यांच्या अनेक हैराण करणाऱ्या संपत्तीचा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे 750 बुटांचे जोड, 800 किलो चांदीही त्यांच्या कपाटात होती.
ऐश्वर्या रायने साकारलीय भूमिका
जयललिता या त्यांच्या काळातील सुपरस्टार होत्या, यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी चित्रपटातून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. चित्रपटातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कायम होती. त्यांच्या आयुष्यावर आत्तापर्यंत सात बायोपिकची घोषणा करण्यात आली होती, मात्र राजकीय दबावामुळे त्या प्रदर्शित झाल्या नाहीत. मणिरत्नम यांचा 'इरुवर' हा चित्रपटही जयललिता यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये ऐश्वर्या रायनं त्यांची भूमिका साकारली होती.












Click it and Unblock the Notifications