'केसरी-२' पहिल्या दिवशी जादू का दाखवू शकला नाही? चित्रपट फ्लाॅप होईल का? काय सांगतात आकडे? वाचा
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा बहुचर्चीत चित्रपट 'केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतरची पडद्यामागची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट 'केसरी'पेक्षा थोडा वेगळा आहे. त्यात पहिल्या भागाप्रमाणे कोणतेही अॅक्शन किंवा हाणामारीचे दृश्ये नाहीत. त्यामुळे 'केसरी २' प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल का, हा खरा प्रश्न होता. त्यातच आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आल्यानंतर हा चित्रपट फ्लाॅप ठरेल का, अशीची चर्चा सुरु झाली आहे.

किती झाली कमाई?
'केसरी २' ने पहिल्या दिवशी ७.१ कोटींपेक्षा जास्त कमावले. 'केसरी'च्या तुलनेत, 'केसरी २' पहिल्या दिवशी गुड फ्रायडेची सुट्टी असूनही अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केसरी'ने पहिल्या दिवशी २१.०६ कोटी रुपये कमावले होते. तथापि, पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर 'केसरी २' ची कामगिरी कशी राहिल, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
शनिवार-रविवारकडून अपेक्षा
या चित्रपटाच्या कमाईत खरी वाढ शनिवारी दुपारच्या शोनंतर दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अक्षय कुमारसारख्या आघाडीच्या अभिनेत्याचा विचार करता, पहिल्या दिवशी ७-८ कोटी रुपयांचा कलेक्शन थोडे कमी आहे. परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांसाठी नाही, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई मंद असली तरी तो चित्रपट दोन आठवडे चालेल, असेही बोलले जात आहे.
पंधरा दिवस राहिल ट्रेंड
या चित्रपटानंतर पुढच्या पंधरा दिवसांत इतर चित्रपट प्रदर्शित होणार नाही. 'रेड २' १ मे रोजी प्रदर्शित होईल. अक्षयचे मागील चित्रपट थोडे कमकुवत होते. त्यामुळे त्याची सुरुवात मंदावली. परंतु पहिल्या आठवड्याच्या शेवटी तो ३५ ते ४० कोटी रुपयांची कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
कोण आहेत कलाकार?
'केसरी चॅप्टर २' हा १३ एप्रिल १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर झालेल्या कायदेशीर लढाईवर आधारित एक कोर्टरूम ड्रामा आहे. हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकापासून प्रेरित आहे. ही कथा वकील सी. शंकरन नायर (अक्षय कुमार) भोवती फिरते, जो या हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारला जबाबदार धरण्यासाठी न्यायालयात लढतो. या चित्रपटात अक्षयसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे हे देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.












Click it and Unblock the Notifications