'संजय कपूरला मुले नको होती, त्याला फक्त....करिश्मा कपूरचं धक्कादायक वक्तव्य!
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांच्या निधनाची बातमीने सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांना धक्का बसला आहे. १२ जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

पोलो खेळताना घडली दुर्दैवी घटना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलो खेळताना संजय कपूर यांनी चुकून मधमाशी गिळली होती. त्यानंतर त्यांना जोरदार हार्ट अटॅक आला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
अंत्यसंस्कारासाठी अजूनही प्रतीक्षा
संजय कपूरचा मृतदेह अद्याप दिल्लीला आणता आलेला नाही. काही कायदेशीर अडचणींमुळे उशीर होत आहे, असे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या मृत्यूची संपूर्ण शवविच्छेदन (पोस्टमार्टम) रिपोर्टही अजून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अधिकृत तपशील मिळायला वेळ लागत आहे.
करिश्मा-संजयच्या तुटलेल्या नात्याची पुन्हा चर्चा
या सगळ्या घडामोडींमध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यातील तुटलेल्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
२००३ मध्ये झालं होतं लग्न, पण...
करिश्मा कपूर आणि दिल्लीतील उद्योजक संजय कपूर यांचे २००३ मध्ये धुमधडाक्यात लग्न झाले होते. करिश्माने लग्नानंतर आपल्या यशस्वी चित्रपटसृष्टीतील करिअरला थांबवले आणि संपूर्ण लक्ष पती आणि सासरच्या कुटुंबावर केंद्रित केले. मात्र, हे नातं करिश्मासाठी त्रासदायक ठरले.
करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा
सध्या सोशल मीडियावर करिश्मा कपूरचा एक जुना मुलाखत व्हायरल होत आहे. त्यात करिश्मा म्हणाली होती - "संजय कपूरला आपल्या मुलांपेक्षा पोलोला अधिक प्रेम होतं." करिश्माने आरोप केला होता की, संजय कपूर आपल्या आजारी मुलाला मागे टाकून पोलो खेळायला निघून जात होते. त्यामुळे करिश्मा यांनी संजय कपूरला एक वाईट पिता म्हटले होते.
"मुलापेक्षा पोलो अधिक प्रिय होता" - करिश्मा कपूर
करिश्माने कोर्टात सांगितले होते की, जेव्हा त्यांचा मुलगा कियान फक्त ४ महिन्यांचा आणि आजारी होता, तेव्हा संजय कपूर तिला एकटीला सोडून प्रिन्स विल्यमसोबत पोलो खेळायला निघून गेले होते. करिश्माने असा आरोप केला की - "संजयने माझ्याशी केवळ माझ्या प्रसिद्धीमुळे लग्न केलं होतं. माझ्याकडे आधीच पैसा होता. माझ्यामुळे त्याला मीडिया कव्हरेज मिळायचं."
रणधीर कपूर यांची प्रतिक्रिया
करिश्माच्या वडिलांनी, रणधीर कपूर यांनी २०१६ मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं - "आम्ही कपूर आहोत, आम्हाला कुणाच्या पैशांची गरज नाही. आमच्याकडे पैसा आहे आणि टॅलेंटही आहे, जे आम्हाला आयुष्यभर उपजीविका पुरवू शकतं."
तिसरं लग्न प्रिया सचदेवसोबत
संजय कपूर यांनी दोन अयशस्वी विवाहानंतर प्रिया सचदेवसोबत तिसरं लग्न केलं. ते तिच्यासोबत आणि त्यांच्या ६ वर्षांच्या मुलासह आलिशान जीवन जगत होते. मात्र २०१६ मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरवर गंभीर आरोप केले होते आणि संजय कपूरनेही करिश्मावर अनेक खळबळजनक दावे केले होते.
करिश्माचे आरोप, मारहाण आणि मानसिक छळ
करिश्मा कपूरने संजय कपूरवर घरगुती हिंसेचे आरोप केले होते. तिने पोलिसात तक्रार दाखल करताना म्हटले होते की, संजय कपूर आणि त्यांचे कुटुंबीय तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होते.
संजय कपूरचे प्रत्यारोप, "करिश्माने मला वापरले"
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, संजय कपूर म्हणाले होते की, "करिश्माने फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केलं. तिचं अभिषेक बच्चनसोबतचं नातं तुटल्यावर तिने मला 'रिबाउंड' म्हणून वापरलं."
संजयच्या मते, करिश्मा कपूर विवाहात भावनिकदृष्ट्या गुंतलेलीच नव्हती. त्याने तिला "लोभी" आणि "क्रूर" अशी विशेषणे दिली होती. संजय कपूरच्या म्हणण्यानुसार, करिश्माने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मुलांशी संपर्क होऊ दिला नव्हता, जेव्हा ती आधी दिलेल्या परस्पर घटस्फोट अर्जातून बाहेर पडली होती.
२०१६ मध्ये घेतला घटस्फोट
२०१० मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि ती आपल्या दोन्ही मुलांसह मुंबईत राहायला आली होती. २०१४ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या दरम्यान, दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले.
शेवटी, २०१६ मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरपासून अधिक त्रास सहन न करता घटस्फोट घेतला. यामध्ये तिला मोठी एलिमनी मिळाली. रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने करिश्माला ७० कोटी रुपये दिले, आणि मुलांच्या नावाने १४ कोटींचे बॉन्ड खरेदी करून दिले. तसेच, संजयने आपल्या वडिलांचं घरही करिश्माच्या नावावर केलं.












Click it and Unblock the Notifications