Kangana Ranaut : कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'हीला विलंब,आता 'या' तारखेनंतरच होणार चित्रपट रिलीज
Kangana Ranaut : कंगना राणावत नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यामुळे ती कधी-कधी वादही ओढावून घेते पण यावेळी मात्र, ती वादात नव्हे तर अडचणीत सापडलीयं. ते म्हणजे तिचाच सिनेमा 'इमर्जन्सी' होयं.आता तुम्ही म्हणाल की काय कारण आहे पण कारण तर मोठ्ठंच आहे. कंगनाचा इमरजन्सी सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ती सुद्धा हा सिनेमा कधी प्रतिक्षेत होतो याचीच तिच्यासह सिनेरसिक प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट कधी रिलिज होणार हे आता समोर आलं आहे.
अभिनेत्री आणि खासदार असलेल्या कंगना तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहततेयं. हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी त्याचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय. कंगना राणौतने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले.

कंगना रानावतनं 'इमर्जन्सी' या चित्रपटाविषयी बरंच काही सांगितलं. यापैकी एक म्हणजे या चित्रपटासाठी तिला आपला बंगला विकावा लागला. नुकतीच एक बातमी आली होती की, कंगनानं मुंबईतील तिचा पाली हिल बंगला विकण्याची योजना आखली. इमर्जन्सी चित्रपटासाठी तिनं आपली सर्व संपत्ती गुंतवली असल्याचं या बातमीत म्हटलं होतं.
बंगला विकला पण चित्रपट रिलिज झाला नाही
या सिनेमामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा चित्रपट रिलीज न झाल्यानं तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे या अभिनेत्रीनं सांगितलयं. कंगनाची मुंबईतली मालमत्ता तेव्हा चर्चेत आली, जेव्हा मुंबई महापालिकेनं त्या बंगल्यावर कारवाई केली होती. 2020 मधील ही घटना होती, बीएमसीनं या बंगल्याचा काही भाग पाडला होता. त्यावेळी कंगनानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी तिचा वादही झाला होता. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात तिचा बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला.
बंगला 32 कोटी रुपयांना विकला
बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा बीएमसीनं केला होता आणि त्यामुळे तो पाडण्यात आला होता. कंगनाने वांद्रे इथली पाली हिल भागातील तिचा बंगला 32 कोटी रुपयांना विकल्याचं समोर आलं होते. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्यामुळं तिचे पैसे अडकले असल्याने तिला हे करावं लागलं असंही कंगनानं सांगितलयं.
कधी होणार इमरजन्सी रिलीज..
कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित इमरजन्सी चित्रपटाबाबत काल मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला जाऊ शकत नाही आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्साॅर एखाद्या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकत नाही, कारण त्यामुळे सिस्टीममध्ये समस्या आहे.
कंगना राणावत हिच्या चित्रपट 'इमर्जन्सी'ला प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय न घेतल्याबद्दल न्यायालयाने सीबीएफसीवर नाराजी व्यक्त केली आणि 25 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता कंगनाचा इमरजन्सी चित्रपट या तारखेनंतरच रिलिज होणार हे स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications