'मला तिचा 'तो' गुण फार आवडतो', जेव्हा जया बच्चन यांनी ऐश्वर्याचं केलं होतं कौतूक,'नेटकरी म्हणतात...'
Jaya Aishwarya Rai Bonding: मागील काही दिवसांपासून बच्चन कुटुंब सोशल मिडीयावर खूप चर्चेत असते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहे. मात्र अनेकवेळा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने एकत्र येत या अफवा असल्याचं सिध्द केलं आहे. नुकतेच ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नातील दोघांचा डांन्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र संपूर्ण बच्चन कूटंब मागील काही दिवसांपासून एकत्र दिसलं नाही.
दरम्यान जेव्हा देशाचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्यावेळेस अभिषेक बच्चन त्याचे वडील अमिताभ, आई जया आणि बहीण श्वेता लग्नात एकत्र दिसले तेव्हा ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्याने लग्नात वेगळी एंट्री घेतली होती, तेव्हापासून या प्रकरणाला अधिक महत्त्व आले.

अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या आणि अभिषेक अलिप्त वागताना दिसले होते. त्यावेळी सोशल मीडियावरील चाहते यामागे बच्चन कुटुंबाचा हात असल्याचा दावा करतात. त्यानंतर जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे अनेक जुने व्हिडिओही व्हायरल होऊ लागले. बच्चन कूटंबात सर्व ठीक नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं.
जया बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नात्याबद्दल सांगितले होते. हा तो काळ आहे जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेकचे नुकतेच लग्न झाले होते. त्या काळात जया बच्चन यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये अनेक मोठे खुलासे केले होते. जया यांनी ऐश्वर्या राय यांना तिच्या कुटुंबात कसे वागवले जाते आणि अमिताभ बच्चनसाठी ती काय आहे हे सांगितले होते.
जया बच्चन म्हणाल्या की, त्यांची मुलगी श्वेता बच्चनच्या लग्नानंतर घरात एक पोकळी निर्माण झाली. पण ऐश्वर्याच्या आगमनाने त्या सर्व कमतरता पूर्ण झाल्या. सासू आणि सून यांच्यातील नात्याबद्दल बोलताना जया बच्चन यांनी ऐश्वर्याचे कौतुकही केले की, ती खूप चांगली सून आहे आणि कुटुंबाचा आदर करते. जया म्हणाल्या की 'ती माझी मैत्रीण आहे, जर मला तिच्यातलं काही आवडत नसेल तर मी तिला थेट तोंडावर सांगते.' मी पाठीमागे राजकारण करणाऱ्यांपैकी नाही. जर ती माझ्याशी सहमत नसेल तर ती मला सांगते'.
जया बच्चन यांनी म्हटलं होतं की, माझे आणि ऐश्वर्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. असो, दोघेही घरी बहुतेक वेळ एकटेच घालवतात. जर मला माझ्या सुनेबद्दल काही आवडत नसेल तर मी ते थेट तोंडावर बोलते. 'ऐश्वर्या खूप शांत आणि छान आहे. ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खूप काळजी घेते. तिला नातेसंबंधांची खूप चांगली समज आहे. फरक एवढाच आहे की, सासू असल्याने मी थोडी जास्त ड्रामेटिक असू शकते तर सून असल्याने तिला थोडे विचारशील असावे लागते. मी कुटुंबातील मोठी आहे.
पुढे बोलताना जया बच्चन म्हणाल्या की मला तिचा तो गुण आवडतो. ती मागे उभी राहते आणि शांत राहते, ऐकते आणि सर्वात उत्तम म्हणजे, ती प्रत्येक वातावरणात सहजतेने मिसळून जाते बसते. मात्र काही दिवसांपासून घडत असलेल्या घडमोडी पाहता नेटकरी नेहमीच जया बच्चन यांना ट्रोल करतात. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आणण्यात जया बच्चन यांचा महत्वाचा रोल आहे, असं अनेकदा नेटकरी सोशल मिडीयावर कॉंमेट करतात.












Click it and Unblock the Notifications