कसा कमी करावा इमोशनल स्ट्रेस..? एआर रहमान दाम्पत्याच्या घटस्फोटाचं होतं मुख्य कारण
AR Rahman's Divorce- प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांचा संसार आज तुटला. संगीतकार व गायक असलेल्या एआर रहमान यांची पत्नी रायरा यांनी आपण घटस्फोट घेत असल्याचे आज जाहिर केले. २९ वर्षांचा या दोघांचा संसार आज मोडला. या दोघांनाही दोन मुली आणि एक मुलगा आहे. यो दोघांनीही संमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे इमोशनल स्ट्रेबस असल्याचं समोर आलं.

कधी झालं होतं रहमानचं लग्न?
एआर रहमान आणि सायरा बानू यांचे लग्न १२ मार्च १९९५ ला झाले होते. या दोघांनी तब्बल २९ वर्षे संसार केला. या दोघांनाही सध्या तीन मुलं आहेत. मात्र तरीही फक्त इमोशनल स्ट्रेसमुळे ते दोघे विभक्त झाले आहोत, असं त्यांच्य पत्नीच्या वकीलांनी सांगितलं. या नात्यात इमोशनल स्ट्रेस कशामुळे आला व तो का येतो. हे आपण पाहूयात.
इमोशनल स्ट्रेस हेच मुख्य कारण
एआर सहमान व सायरा यांचा घटस्फोट झाला. सायरा यांच्या वकील वंदना शाह यांनी ही घोषणा केली. भरपूर प्रेम असूनही या दोघांना जाणवलं की, तणावामुळे या दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. सायरा यांनी घटस्फोटाचं कारण सांगताना इमोशनल स्ट्रेस हेच एक कारण सांगितलंय. या नात्यात फक्त या वेदनेमुळेच दूर जाण्याचा निर्णय घेतला असंही सायरा यांनी स्पष्ट केलं.
इमोशनल स्ट्रेस म्हणजे नेमकं काय?
या दाम्पत्याच्या विभक्त होण्याचं मुख्य कारण आहे इमोशनल स्ट्रेस, पण इमोशनल स्ट्रेस म्हणजे नेमकं काय हे प्रत्येक पती-पत्नीला माहित असावं. जेव्हा एखाद्या नात्यातील वाढलेलं अंतर हे स्ट्रेसचं म्हणजेत तणावाचं कारण होतं, त्यावेळी त्याला इमोशनल स्ट्रेस असं म्हणतात. याची अनेक कारणे असतात. संवादाचा अभाव, विश्वासाचा अभाव अशा अनेक कारणांनी स्ट्रेस येतो. अनेकदा पती-पत्नीमध्ये संशय वाढल्यानेही स्ट्रेस येतो. पती-पत्नीच्या नात्यात अनेकदा एकमेकांबाबत अनावश्यक अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाही की तणाव येतो. नात्यातील अनेक गोष्टींमुळे इमोशनल स्ट्रेस तयार होतो.
इमोशनल स्ट्रेस कसा कमी करता येतो?
इमोशनल स्ट्रेस घालवायचा असेल तर, संवादासारखा प्रभावी उपाय नाही. दोघांनीही एकमेकांशी बोललं की, समस्या सुटतात. अनेकदा समस्या समजल्याच नाहीत तर त्या वाढतात. त्यामुळे संवाद हा इमोशनल स्ट्रेस कमी करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अनेकदा अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर, इतर गोष्टीत लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही एक्स्पर्ट देतात. कारण तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं तर त्यात आपण जास्त गुरफटून जावू शकतो. त्यामुळे आपले लक्ष इतरत्र खर्च केलं तर नात्यातला तणाव दुर्लक्षित होतो आणि नातं टिकतं.












Click it and Unblock the Notifications