अमिताभ अन् धर्मेंद्र चित्रपटसृष्टीतील धुरंधर मित्र; जिगरी मित्रावर का केला होता गोळीबार, वाचा किस्सा
Amitabh Bachchan And Dharmendra friendship : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दोन धुरंदर अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन अन् धर्मेंद्र. यांची मैत्री ही अनेकांना प्रेरणादायी आहे. आजही हे दोन्ही महानायक एकमेकांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढतात. पण त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही किस्से हे आजही ऐकूण अनेकांना हसू आल्याशिवाय राहणार नाही, असेच आहेत. पण ते किस्से एकेकाळी एकमेकांच्या जीवावर देखील उठल्याचे सांगितले जातात.
'शोले' हा चित्रपट जगभरात एक माईलस्टोन ठरला अन् या फिल्मने अनेक विक्रम मोडले. आजही लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. या चित्रपटाने चित्रपट जगताला दोन मित्र दिले ज्यांची मैत्री अनेकांना प्रेरणा देत असते. ते मित्र आहेत- धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन. 'शोले'मध्ये त्यांची केमिस्ट्री पडद्यावर जितकी चांगली होती, तितकीच त्यांची ऑफ स्क्रीन बॉन्डिंगही चांगली राहिली. या दोन मित्रांच्या मैत्रीची सुरुवात नेमकी कशी झाली याची उत्सुकता अजूनही लोकांना आहे. या मैत्रीची सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घेऊया, एवढे खास मित्र असूनही धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी का चालवली होती, याचा किस्सा देखील जाणून घेऊया.

'शोले'पूर्वी अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यात व्यस्त होते. त्याचवेळी, धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल चर्चा सुरू असताना, रमेश सिप्पी यांच्या मनात धर्मेंद्रसोबत शत्रुघ्न सिन्हा यांना कास्ट करण्याची योजना ठेवली. कारण, शत्रुघ्न सिन्हा देखील टॉपचे अभिनेते होते. त्यांचेही चित्रपट खूप चालत असत अन् प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारे होते. अशा स्थितीत 'जय'च्या भूमिकेसाठी शत्रूघ्न यांची कास्टिंग होणार होती, पण तसे झाले नाही.
अखेर अमिताभ बच्चन यांना मिळाली संधी
अमिताभचे मागील चित्रपट बघून रमेश सिप्पी यांनी त्यांना चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र आणि शत्रुघ्न यांना एकत्र आणणं सोपं नव्हतं, असंही म्हटलं जातं. दोघांना समान स्क्रीन स्पेस देणे हे मोठे काम ठरले असते. अशा परिस्थितीत सिप्पी यांनी हा वाद टाळण्यासाठी अमिताभ यांना घेतले कारण ते त्यावेळी बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते.
धर्मेंद्र यांनी नाव सुचवले होते
अनेक बॉलीवूड जगतातील सुत्रांनी वर्तवविले होते की, या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची भेट घेतली होती. त्यांनी धर्मेंद्र यांना त्यांच्यासोबत काम करायचे असल्याचे सांगितले होते. अमिताभ यांनी त्यांच्या काही मुलाखतींमध्ये असेही म्हटले आहे की, धर्मेंद्र यांच्या विनंतीवरुन त्यांना 'जय'ची भूमिका मिळाली. यावर धर्मेंद्र म्हणाले होते की, असे काही नाही. रमेश सिप्पी यांना अमिताभचे काम आवडले म्हणून त्यांना घेण्यात आले. त्याचवेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना तारखांमुळे हा चित्रपट सोडावा लागला होता. एकंदरीत या चित्रपटात कास्टींग करण्यामागचे कारण काहीही असले या चित्रपटाने धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली अन् जी आजही कायम आहे.

धर्मेंद्र-अमिताभ अनेकदा भेटतात
'जय आणि वीरू' म्हणजेच अमिताभ आणि धर्मेंद्र यांची मैत्री वर्षानुवर्षांची आहे. दोघेही एकमेकांच्या दु:खात सोबती आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढतात. अमिताभ हे या इंडस्ट्रीचे इंजिन आहेत, जे कधीही खचून जात नाहीत, असे धर्मेंद्र यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगितले.
धर्मेंद्र यांनी बच्चन यांच्यावर गोळी झाडली
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे चित्रपटसृष्टीत चांगले मित्र मानले जातात. त्यांचा 'शोले' हा चित्रपट मैत्रीवर आधारित होता, जो आजपर्यंत लोकांना पाहायला आवडतो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 49 वर्षे झाली आहेत, पण 'गब्बर सिंग' आणि 'ठाकूर' यांच्यातील वैर आणि या लढ्यात उडी घेतलेल्या 'जय आणि वीरू'मधील मैत्री अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्याचबरोबर या चित्रपटातील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनावर अमिट छाप सोडलेली आहे.

अन् अमिताभ बच्चन यांच्या कानाजवळून गेली गोळी
शोले हा चित्रपट बॉलीवूडचा क्लासिक कल्ट चित्रपट मानला जातो. 'जय-वीरू'च्या कॉमेडीसोबतच 'बसंती' हेमा मालिनी आणि ठाकूर यांची सून जया बच्चन यांची खोडकर कृती आणि निरागसपणा खूप आवडला. हा चित्रपट परिपूर्ण बनवण्यात निर्मात्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. धर्मेंद्रने खरे तर परफेक्शनमध्ये गोळीबार केला. खरे तर 'शोले'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये गब्बर सिंगच्या कैदेतून सुटल्यानंतर वीरू बसंतीसोबत पळून जाण्यापूर्वी बंदूक उचलतो, असे दाखवण्यात आले आहे. तो बॉक्स उघडतो, ज्यात गोळ्या असतात, त्या बाहेर काढतो आणि खिशात ठेवतो. मात्र, धर्मेंद्र यांना या सीनसाठी अनेक रिटेक द्यावे लागले, त्यामुळे त्यांनी चिडून हवेत गोळीबार केला, जो अमिताभ यांच्या कानाजवळून गेला.
अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता
'कौन बनेगा करोडपती'च्या एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी याचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, जेव्हा आम्ही तो सीन शूट करत होतो, तेव्हा धर्मेंद्र खाली आणि मी टेकडीच्या वर होतो. धर्मेंद्र पेटी उघडतात आणि गोळ्या घेतात. त्यांना या सीनसाठी तीन ते चार वेळा करावे लागल्याने त्यांची चीडचीड झाली अन् त्यांनी थेट बंदुकीतून गोळीबार केला, अर्थात ती गोळी ओरिजनल होती. ती थेट माझ्या कानाजवळून गेली तेव्हा माा थरकाप उडाला होता. मृत्यूच्या दाढेतून ते थोडक्यात बाहेर आले होते, असेही त्यांनी सांगितले होते.












Click it and Unblock the Notifications