Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bigg Boss मधून बाहेर येताच सदावर्तेंची प्रतिक्रीया! निवडणुकीत या नेत्याला चॅलेंज, दाऊदवरही वक्तव्य!

Gunaratna Sadavartas reaction to coming out of Bigg Boss : बिग बाॅसमधून बाहेर येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाअर्थी ते आदित्य ठाकरेंना चॅलेंज देणार आहेत.

बिग बाॅसमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी दाऊद इब्राहीम, सिल्व्हर ओक ते कलानगर संदर्भात वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य शिवसेना युबीटीचे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना आव्हान देणारे आहे. तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ते सलमान खानचा बिष्णोई गँगशी असलेला वाद यावरही त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

Gunaratna Sadavartas reaction to coming out of Bigg Boss

बिग बाॅसमधून मला काढले नाही मीच बाहेर आलो

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आमच्यासोबत सतरा होते त्यात दोन तीन सोडले तर सारे सिनेजगतात स्ट्रगल्स करणारे होते. आम्ही बिगबाॅसला सांगितले की, मला कोर्ट जाॅईन करावे लागते. मी इलिमिनेट झालेलो नाही. बिग बाॅसमधून मला काढले ही गोष्ट खरी नाही. माझ्यासाठी आरक्षणाची केस कोर्टात आहे आणि ती महत्वाची आहे त्यामुळे मी बाहेर आलो.

तत्व, विचारांसाठी मी जेलमध्ये गेलो

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, माझ्या स्टाईल आणि ड्रेसचे श्रेय माझी पत्नी जयश्रीला जाते. मला वकील बनवण्यात स्टाईल आणि इतर गोष्टींत तिचा माझ्या जीवनाचा ती भाग आहे. मी वकिल आहे आणि आधी मी बिग बाॅसमध्ये आधी समजून घेतले मग माझा खेळ सुरु केला. जेलयात्रा आम्ही जीवनात केली आहे. दाऊदसारखे नाही तर आम्ही देशातील तत्वांसाठी विचारांसाठी मी जेलमध्ये जातो.

सिल्व्हर ओकचा जोक बनवलाय

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राजकारणाची गोष्टच करायची तर आम्ही सिल्व्हर ओकचा जोक बनवलाय. कलानगरला आम्ही जागेवर बसवलं आणि येत्या निवडणुकीत मी ही वरळीतून निवडणूक लढवणार आहे असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिले आहे. आम्ही वरळीत जिंकून दाखवू. माझे अनेक रुप आहे म्हणजे आम्ही चित्रपटात जवळून पाहीली नाही पण मी हेच सांगतो की, फिल्मी कलाकारांनी अंडरवर्ल्डपासून थोडं अंतर ठेवा. अंडरवर्ल्ड मोठी बिमारी आहे. त्यापासून दूर राहीलेले बरे.

अंडरवर्ल्ड वाल्यांना पायाखाली तुडवायला हवे

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, अंडरवर्ल्ड वाल्यांना पायाखाली तुडवायला हवे त्यामुळेच मी बुट घालतो. बाबा सिद्दीकीची हत्या झाली त्यांचे जीवन मी जास्त वाचले नाही. पण राजकीय नेत्यांसोबत असे प्रकार खूपच कमी घडतात. बाबा सिद्दीकीच्या प्रकरणाची एकाच नाही तर वेगवेगळ्या अँगलने व्हायला हवी. डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या संबंधानेही तपास करायला हवा. विचारात खरेपणा असला तर काहीही धोका नाही.

सलमान खान यांनी चर्चेने प्रश्न सोडवावा

सलमानबद्दल मी हेच म्हणेल की, जे हिंदु धर्माचे विश्वगुरू आहेत त्यांना बोलायला हवे. त्यात माझी काही मदत लागली तर मी सहकार्य करेल. धर्मपंडीत, शंकराचार्य यांच्याशी चर्चा करावी आणि सलमान खानने ट्रेस न घेता चर्चा केल्यास त्याला दिलासा मिळेल. चर्चा, विचाराने गोष्टी बदलू शकतात असेही सलमान खानच्या संदर्भात सदावर्ते म्हणाले. सलमान खान यांना याआधी मी भेटलो नाही पण पहिल्यांदा बिगबाॅसमध्ये भेटलो तेव्हा असे वाटले की, एक अॅक्टरला प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्याची खुबी मी जाणली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+