Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चिराग पासवान आणि कंगना राणौतचे नाते कसे आहे? आता त्यानेच उघड केले गुपित,घ्या जाणून

Chirag Paswan Kangana Ranaut: चिराग पासवान आणि कंगना रणौत यांनी 2011 मध्ये आलेल्या 'मिले ना मिले हम' चित्रपटात एकत्र काम केले होते.त्यावेळी हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर चिरागने बॉलीवूड सोडले पण त्याचे सहकलाकार कंगनासोबत चांगले संबंध आहेत.

Chirag Paswan Kangana Ranaut

कंगना रणौतने निवडणूक जिंकल्यानंतर तिचे चिराग पासवानसोबतचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता एका मुलाखतीदरम्यान चिराग पासवानने कंगना राणौतसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान यांनी म्हटलं की, 'तो काळ वेगळा होता आणि तो कठीण होता की, सोपा होता हे मी सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबातील कोणीही बॉलिवूडमध्ये गेले नाही. चित्रपटाच्या दृष्टीने मी असे म्हणू शकतो की माझ्या सात पिढ्यांचा चित्रपटांशी संबंध नाही. ते बनवण्याचा प्रयत्न करणारा मी पहिला व्यक्ती होतो. पण, मला लवकरच समजले की, ही एक आपत्ती आहे. मला माहित होते की मी अॅक्टींगसाठी तयार नाही झालो.

कंगना रनौतसोबतच्या मैत्रीबद्दल चिराग पासवान म्हणाला, 'अॅक्टींगमध्ये नशीब आजमावल्यानंतर माझ्यासोबत एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे कंगना आणि मी खूप चांगले मित्र झालो. ही चांगली गोष्ट आहे जी आम्ही त्या काळापासून पुढे नेत आहे. संसदेत कंगनाला भेटून मी खूप उत्सुक होतो. कारण गेली तीन वर्षे मी खूप व्यस्त होतो. त्यामुळे माझा कंगनाशी संपर्क होत नव्हता . मंडी मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत राजकारणात सक्रीय झाली आहे. पण सध्या कंगनाने बॉलिवूड सोडले नाही. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+