जया बच्चन यांनी अचानक का सोडली होती फिल्म इडंस्ट्री? सांगितले मोठे कारण
Jaya Bachchan : जया बच्चन यांनी 1973 मध्ये मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही काळ त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र नंतर हळूहळू त्या इंडस्ट्रीपासून दूर होत गेल्या. अशा परिस्थितीत हा सवाल उपस्थित होतो की, ही गुणी अभिनेत्री अचानक चित्रपटांपासून का आणि कशी दुरावली?
जया यांनी इंडस्ट्री का सोडली?
जया बच्चन यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही दिसत आहेत. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, लग्नानंतर अचानक असे काय झाले की त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले.

अभिनेत्रीने दिले 'हे' उत्तर
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा जया बच्चन यांना विचारण्यात आले की,त्यांनी चित्रपटात काम करणे का सोडले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, त्यांचा सगळा वेळ मुलांची देखभाल करण्यात जात होता. यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी अभिषेक, श्वेता आणि तिसरे अमिताभ यांची नावे घेतली. हे ऐकून बिग बी हसायला लागले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
यानंतर जया यांना जेव्हा विचारण्यात आले की, ती पुन्हा चित्रपटांमध्ये परतण्याचा विचार करत आहात का? अभिनेत्रीने 'नाही असे उत्तर दिले होते. मी पुन्हा काम सुरू केलेले नाही. मला अजून तीन मुलं सांभाळायची आहेत असं जया त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. जया बच्चन यांनी आपल्या करिअरपेक्षा मुलांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि अनेक मुलाखतींमध्ये त्या याविषयी मोकळेपणाने बोलल्या आहे. सध्या अभिनेत्रीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जया बच्चन यांचा शेवटचा चित्रपट
फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावल्यानंतर जया बच्चन राजकारणाकडे वळल्या. मात्र, त्यांनी इंडस्ट्री पूर्णपणे सोडलेली नाही. त्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसल्या होत्या जो गेल्या वर्षी 2023 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील जया बच्चन यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.


Click it and Unblock the Notifications
