'मी एकटी आराध्याचा सांभाळ करु शकते, मला कोणाचीही गरज नाही', ऐश्वर्या रायचे मोठे विधान
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या वैवाहिक जीवनाबाबत सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवले आहे.
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांचे लग्न
बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. लग्नानंतर ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे 2007 साली लग्न झाले होते. यानंतर 2011 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायने मुलगी आराध्याला जन्म दिला.

ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याचे बाँडिंग
ऐश्वर्या रायने तिचा पती अभिषेक बच्चन आणि सासरच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. परंतु ती नेहमीच तिची मुलगी आराध्यासोबत दिसते. त्याचबरोबर मुलगी आराध्याही वडिलांपेक्षा तिच्या आईसोबत फिरताना दिसत आहे. ऐश्वर्या राय अनेकदा तिच्या मुलीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.
'मी एकटी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकते'
ऐश्वर्या रायने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला हवे असेल तर ती तिच्या मुलीची काळजी घेण्यासाठी अनेक महिलांची नियुक्ती करु शकते, परंतु तिने असे कधीच केले नाही. ऐश्वर्या म्हणाली होती- मी एकटी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकते. आराध्याला वाढवण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही.
माझ्या मुलीवर माझे सर्वात जास्त प्रेम
ऐश्वर्या राय पुढे म्हणाली होती- मी माझ्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम करते. मी कोणत्याही अटीशिवाय प्रेम करते. ती माझा जीव आहे आणि म्हणून मला तिच्यासाठी कोणाचीही गरज नाही. तिच्यासाठी मी एकटीच पुरेशी आहे.












Click it and Unblock the Notifications