बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेपुर्वीच विजेत्याच्या नावाची घोषणा? भाकितामध्ये आलं 'हे' धक्कादायक नाव
Bigg Boss 19 Winner Prediction Tanya Mittal's Name Leaked : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोमध्ये आता फक्त ८ स्पर्धक उरले आहेत आणि 'तिकीट टू फिनाले' टास्क जिंकून गौरव खन्नाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, अंतिम सोहळ्यापूर्वीच एका ज्योतिषीय भविष्यवाणीने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे, ज्यात विजेत्याचे नाव समोर आले आहे.

बिग बॉस १९ मध्ये कोण-कोण शिल्लक?
या पर्वात एकूण १८ स्पर्धकांनी प्रवेश केला होता, पण आता फरहाना भट्ट, तान्या मित्तल, अमाल मलिक, शहबाज, प्रणित मोरे, गौरव खन्ना, अशनूर आणि मालती चहर हे ८ स्पर्धक घरात उरले आहेत. या सर्वांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.
पहिला फायनलिस्ट कोण?
'तिकीट टू फिनाले' टास्कमध्ये गौरव खन्नाने बाजी मारली आहे. या विजयामुळे तो थेट अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि आता त्याचा इव्हिक्शन होणार नाही. तो शो जिंकेल की नाही, हे पाहण्यासाठी मात्र ग्रँड फिनालेची प्रतीक्षा करावी लागेल.
विजेत्याबाबत 'शॉकिंग' भविष्यवाणी
अंतिम सोहळ्याला अजून वेळ असला तरी, ज्योतिषी डॉ. वाय राखी यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या ज्योतिषीय आकडेवारी आणि वोटिंग पॅटर्नच्या विश्लेषणानुसार, यावर्षी तान्या मित्तल 'बिग बॉस १९' ची विजेती होऊ शकते.
यापूर्वी शोमध्ये आलेल्या एकता कपूरनेही आपल्या ज्योतिष ॲपचा उल्लेख करत तान्याचे 'सितारे बुलंदीवर' असल्याचे सांगितले होते. तिने थेट विजेतीचे नाव घेतले नसले तरी, तिच्या इशाऱ्यातून तान्याला यश मिळू शकते, असे सूचित केले. महत्त्वाचे म्हणजे, एकता कपूरने तान्याला तिच्या आगामी मालिकेची ऑफरही दिली आहे.
या भविष्यवाणीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, शोच्या सुरुवातीला ज्या स्पर्धकाला विजेते मानले जात होते, त्याचेच नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.












Click it and Unblock the Notifications