Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ब्राम्हणांवरील टीप्पणीवर अनुराग कश्यपने मागितली माफी; म्हणाला ही माझी माफी आहे माझ्या पोस्टसाठी नाही

Anurag Kashyap : अनुराग कश्यप: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या त्याने केलेल्या विधानाबद्दल चर्चेत आहे. अनुराग कश्यपने टिप्पणी करत ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले. आपल्या टीप्पणीनंतर आता त्याने माफी मागितली आहे.

समाजसुधारक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित असलेल्या 'फुले' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे विधान समोर आले आहे.

Anurag Kashyap

अनुराग कश्यप विरोधात झाली होती तक्रार दाखल

सध्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली असून आता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जनतेची माफी मागितली आहे.

काय होती अनुराग कश्यप यांची पोस्ट?

इंस्टाग्राम स्टोरीजवर अनुराग कश्यप यांनी लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील पहिले नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होते. भाऊ, जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती?, आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटत आहे किंवा ते लाजेने मरत आहेत किंवा ते आपण पाहत असलेल्या वेगळ्या (पर्यायी) ब्राह्मण भारतात राहत आहेत, जे आपण समजू शकत नाही. कोणीतरी कृपया समजावून सांगा - इथे खरं मूर्ख पणा कोण करत आहे?'

18 एप्रिल 2025 (शुक्रवार) रोजी इंस्टाग्रामवर अनुराग कश्यप यांनी पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने आपला हेतू स्पष्ट केला आणि म्हटले की कोणीही त्याच्यावर रागावू शकतो परंतु केवळ त्यावर राग येऊ शकतो. अनुराग कश्यपने कमेंटनंतर आपल्या लोकांना मिळालेल्या धमक्यांचा संदर्भ देत लिहिले होते - कोणतीही कृती किंवा भाषण तुमची मुलगी, कुटुंब किंवा मित्रांना उपयुक्त नाही.

अनुराग कश्यपने मागितली लोकांची माफी

अनुराग कश्यपने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- ही माझी माफी आहे, माझ्या पोस्टसाठी नाही, तर त्या एका ओळीसाठी आहे जी संदर्भाच्या बाहेर काढली गेली आणि जी द्वेष निर्माण करत आहे. तुमची मुलगी, कुटुंब, मित्र आणि सहकारी यांच्याविरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्यासाठी कोणतीही कृती किंवा भाषण योग्य नाही.

..तर मला शिवीगाळ करा

कश्यप यांनी पुढे लिहिले की, त्यामुळे जे मी म्हटले आहे ते परत घेता येणार नाही आणि मी ते परत घेणार नाही. पण तुम्हाला कोणाला शिवीगाळ करायची असेल तर मला शिव्या द्या. माझे कुटुंब काही बोलले नाही आणि ते कधी काही बोलत नाहीत.

तुम्ही कोणत्या प्रकारचे? ठरवा..

आता अनुराग कश्यपने लिहिले आहे- तर तुम्ही माफी मागायला पाहत असाल तर ही माझी माफी आहे. ब्राह्मणांनो, कृपया स्त्रियांना एकटे सोडा. केवळ मनुस्मृतिच नव्हे तर धर्मग्रंथही इतके सभ्यपणा शिकवतात. तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते तुम्हीच ठरवा. जोपर्यंत माझा संबंध आहे, मी माफी मागतो.

कधीपासून सुरु झाला हा वाद...?

इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा (अनुराग कश्यप (@anuragkashyap10) ने शेअर केलेली पोस्ट)

दिग्दर्शक अनुराग कश्यपने सोशल मीडियावरील एका यूजरला त्याच्या कमेंटवर उत्तर दिले तेव्हापासून हा वाद सुरू झाला. त्या यूजरने लिहिले होते- ब्राह्मण तुझे वडील आहेत. यावर अनुराग कश्यपने संताप व्यक्त करत लिहिले- मी ब्राह्मणावर XXX करेन, काही हरकत नाही. यानंतर अनुराग कश्यपची पोस्ट व्हायरल झाली ज्यामुळे अनेक ब्राह्मण संघटनांमध्ये नाराजी पसरली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+