Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

3 वेळा लग्न तरीही अनुप जलोटा बाशिंग बाधणार? चौथ्या लग्नाबाबत म्हणाले-'माझी पत्नी म्हणाली अफेअर ठेवा"

Anup Jalota love story: 'ऐसी लगान मीरा हो गई मगन' सारखी प्रसिद्ध गाणी गाऊन प्रसिद्ध झालेले अनुप जलोटा हे नेहमीच त्यांच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी तीन वेळा लग्न केले परंतु काही कारणास्तव ते फार काळ टिकले नाही. त्यानंतर आता त्यांच्या चौथ्या लग्नाची जोरदार चर्चा असून ते पुन्हा बाशंग बांधणार का अन् बोहल्यावर चढणार का याचीही आता चर्चा होत आहे.

अनुप जलोटा यांची पहिली पत्नी सोनाली सेठ होती. ती घरातून पळून गेली होती. यानंतर त्यांनी बीना भाटियासोबत दुसरे लग्न केले. पण हे नातेही तुटले. यानंतर तो पुन्हा प्रेमात पडले आणि कुमार गुजराल यांची भाची मेधा गुजराल हिच्याशी लग्न केले पण तिचा मृत्यू झाला.

Anup Jalota love story

प्रेमसंबंध ठेवण्याचा पत्नीचा सल्ला

अनुप जलोटा यांनी सांगितले की, त्यांची तिसरी पत्नी आजारी असताना त्यांनी अनुप जलोटा यांना प्रेमसंबंध ठेवण्याचा सल्ला दिला. यासंदर्भात अनुप जलोटा म्हणाले, 'माझ्या पत्नीची तब्येत बिघडली होती, तेव्हा ती रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये राहायची. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझं पण तिच्यावर खूप प्रेम होतं. ती अजूनही माझ्या हृदयात आहे.

ती माझ्या हृदयात जीवंत

अनूप जलाटा यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी पत्नीने माझी अवस्था पाहून मला प्रेमसंबंध ठेवण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली होती की, 'तुझे कोणाशी तरी अफेअर असू शकते.' यानंतर अनुप जलोटा यांनी यावर नकार देत या गोष्टीची गरज नसल्याचे सांगितले. अनुप जलोटा म्हणाले, 'ती अजूनही माझ्या हृदयात जिवंत आहे आणि मी दिवसरात्र फक्त तिचचीच आठवण काढतो.' असे पत्नीबाबत ते म्हणाले.

यानंतर अनूप जलोटा यांना त्यांच्या चौथ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता, लोक तुम्हाला लग्न करण्याचा सल्ला देत नाहीत का? ते म्हणाला, 'माझ्या मनाला आता कुठेच वाटत नाही. गालिबचे हृदय प्रेमाने भरले आहे, आता तो कोणाच्याही प्रेमात पडत नाही. अनुप जलोटा यांनी सांगितले की, आता तो आपल्या कामात इतका व्यस्त आहे की वयाच्या 71 व्या वर्षी त्यांना जोडीदाराची गरज भासत नाही.

अनूप जलोटा यांची तिसरी पत्नी मेधा हिचे 2014 मध्येच निधन झाले होते. त्यांना किडनीचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी परदेशात जावे लागले. मात्र सर्व प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+