'अंदाज अपना अपना'च्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर खान गैरहजर; म्हणाला मी परेशान आहे! कारण काय?
Andaz Apna Apna released but Aamir Khan absent from special screening : रसिकांच्या दिलाची धडकन असलेला चित्रपट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि त्यानंतरच्या गोष्टीत व्यस्त आहे. 1994 ला रिलीज झालेला चित्रपट अंदाज अपना अपना आज 25 एप्रिल 2025 रोजी पुन्हा रि-रिलीज झाला आहे. रसिकजन या चित्रपटाची वाट पाहत होते.
अंदाज अपना अपना या चित्रपटाचे बुकींग चालूच असून याल मोठा प्रतिसात लाभला आहे. रिलीजपुर्वी झालेल्या लक्षवेधी बुकींगमुळे या चित्रपटाकडे रसिकांचे लक्ष लागलेले आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार,अंदाज अपना अपनाने आपल्या पहिल्याच दिवशी जवळपास साडेपाच हजार तिकीटांची विक्री झाली आहे. अडव्हाॅन्स बुकींगला एवढा मोठा प्रतिसाद पाहता आमिरची फिल्म बाॅक्स ऑफिसवर धमाल करेल का हे लवकरच कळेल.

स्पेशल स्क्रिनिंगला आमिर खान राहीला गैरहजर
एकीकडे आमिरच्या चित्रपटाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आमिर खान त्याला अंदाज अपना अपना च्या स्पेशल स्किनिंगला तो उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे एवढा प्रतिसाद असलेल्या आमिर त्याच्याच चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित न राहील्याचे कारण काय असा सवाल आता सिनेरसिक करत आहेत.
आमिरखान यामुळे आहे परेशान?
स्क्रिनिंगला हजर न राहील्याचे कारण देत आमिर खानने आपण परेशान असल्याचे म्हटले आहे, आता आमिरने हे का म्हटले याचे कारणही समोर आले आहे. काश्मीरमद्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशात संताप आहे, या दुःखात सारा देश आहे. या हल्ल्याच्या जखमा एवढ्या भीषण आहेत आणि यामुळेच टीव्ही आणि बाॅलीवूड इंडस्ट्रीमधील स्टारकास्टंनीही आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. गायकांनी आपले लाईव्ह कान्सर्ट रद्द केले आहेत. पहेलगाम हल्ल्याने आमिर खानही व्यथित झाला आहे. त्यामुळे त्यानेही स्पेशल स्क्रिनिंग पाहणे टाळले आहे.
हल्ल्यावर काय म्हणाला आमिर खान?
आमिर खानने म्हटले की, काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील बातम्या मी वाचत होतो. अनेक निष्पापांचे बळी घेण्यात आले, हे ऐकून मी सुन्न झालो आहे, त्यामुळे मी अंदाज अपना अपना चे स्क्रिनिंग पाहिले नाही ते या आठवड्याच्या शेवटपर्यंत बघेल.
अंदाज अपना अपना हा चित्रपट आज देशातील चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट देशात एकाचवेळी प्रदर्शित झाला असून 1994 ला आलेला सिनेमा पुन्हा याच नावाने रि-रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मनोरंजक चित्रपट असून आमिर खानने या सिनेमाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे की, तो रसिकांचे पुर्णपणे मनोरंजन करेल.












Click it and Unblock the Notifications