या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही... प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना पार धूतलं...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आ. सुरेश धस यांनी काल काही अभिनेत्रींची नावे घेऊन, बीडमधल्या आकावर गंभीर आरोप केले होते. या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळींचंही नाव घेतलं गेलं. त्यानंतर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत आ. धसांना चांगलंच सुनावलं.

काय म्हणाल्या प्राजक्ता माळी?
पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी म्हणाल्या, आ. सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला मी शांतपणे सामोरे जात आहे. शांतता ही माझी मुक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार यांची ही हतबलता आहे. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये, म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही.
पुरुषांचं नाव का घेतलं नाही?
प्राजक्ता माळी पुढे म्हणाल्या, "परळीला पुरुष कलाकार कधी गेले नाहीत का? तुम्हाला उदाहरण द्यायचं, तर पुरुष कलाकारांची नावे घ्या. स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावे घेतली जातात. अतिशय कुत्सितपणे नावं घेतली. कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, मनोरंजन करणं, चुकीचं नाही. आम्ही जात राहणार, प्रेक्षकांचं मनोरंजन करणार..असंही प्राजक्ता माळी यांनी ठणकावून सांगितलं.
कुणाशीही नाव जोडणार का?
माळी यांनी आ. सुरेश धसांना चांगलंच सुनावलं. त्या म्हणाल्या, "या आधीही प्रथितयश नेत्यांबरोबर आमचे फोटो आहेत. मान्यवरांबरोबर फोटो आहेत. त्या फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कुणाही बरोबर नाव जोडणार का? एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला ही बाब निंदनीय वाटते. राज्यातील राजकारण्यांना ही गोष्ट शोभत नाही. कशावरही राजकारण होऊ नये." असं स्पष्ट मत प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केलं.एखादी महिला स्वतःच्या जिवावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टानं एखादा व्यक्ती मोठा होतो. यावर तुमचा विश्वास नाही बसत का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता ही खेदजनक बाब आहे," असंही प्राजक्ता माळी यांनी सुनावलं.
काय म्हणाले सुरेश धस?
प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी सुरेश धस यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. प्राजक्ताताईंबाबत मी चुकीचं बोललेलो नाही. मी माझ्या वक्तव्यावर आजही ठाम आहे. त्यांना ही पत्रकार परिषद कोण घ्यायला लावतंय, हेही मला माहित आहे, असं म्हणत आ. धस यांनी त्यांच्या कालच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी कोठेही तक्रार केली तरी, मी समर्थ आहे, असंही धस यांनी स्पष्ट केलं होतं.












Click it and Unblock the Notifications