Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Atul Kulkarni : अभिनेता अतुल कुलकर्णींचे दहशतवाद्यांना चॅलेंज! काश्मीरमध्ये ते का गेले? हे आहे कारण

Actor Atul Kulkarni in Kashmir : पहलगाममध्ये भीषण हल्ला झाला असून पर्यटक येथून आपापल्या घरी परतत आहे, मोठी दहशत या परिसरात हल्ल्याने निर्माण केली आहे, अशा स्थितीत सिनेअभिनेता अतूल कुलकर्णी हे काश्मीरात पोहचले असून निर्भय व्हा घाबरु नका, असा संदेश देण्यासाठीच आपण येथे आल्याचे म्हटले आहे.

Actor Atul Kulkarni in Kashmir

"दहशतवाद्यांना हेच हवंय कि, काश्मीर आमची मालकी आहे आणि येथे भारतीयांना येऊ नये तसे कधीच होणार नाही, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आमच्या घरी आम्ही येणारच." असे म्हणत त्यांनी एका भारतीय नागरिकाची महत्वकांक्षा आणि मनसुबा काय आहे याचाच परिचय दिला आहे.

काश्मीरमध्ये आज अतूल कुलकर्णी पोहचले आहेत, त्यांनी एनआय आणि बीबीसीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते पहलगाम हल्ला ही दुखःद घटना आहे. जेही झाले ते अत्यंत वाईट आहे, हे चांगले झाले नाही. आम्ही काय करु शकतो आपण फक्त सोशल मीडियावर लिहतो आणि दुःख व्यक्त करतो पण मी स्वःत काय करु शकतो याचा विचार आपण करायला हवा. मला समजले की, काश्मीरात येणारे नव्वद टक्के बुकींग रद्द झाले आहे. त्यामुळे मी येथे आलो आहे.

काश्मीरी आणि पर्यटन सांभाळा

अतूल कुलकर्णी म्हणाले, मी मुंबईतून आज सकाळी श्रीनगरमध्ये आलो आणि तेथून मी चालतोय आणि मध्ये थांबत आहोत. आपली काश्मीरीयत आणि काश्मीरी लोकांना आपल्याला सांभाळायचे आहे. पर्यटन म्हणजे फक्त आर्थिक गोष्टच असते असे नाही त्याचा अर्थ लोक एकमेकांशी जुळले जातात, संस्कुतीचे आदानप्रदान होते. लोक एवढ्या मोठ्या संख्येने येत होते ते अचानक थांबले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकमेकांना भेटत होते, पण आता हे थांबले आहे, हे थांबायला नको म्हणून मी येथे येण्याचा निर्णय घेतला.

काश्मीरींमध्ये प्रेमाची गरज आहे या...

मी जर येथे आलो तर लोकांपर्यंत संदेश जाईल की, जर दहशतवाद्यांचा विजय होऊ द्यायचा नसेल तर अनेक उपाय असतील त्यात शासन प्रशासन ते करत राहील पण आपण दहशतवाद्यांनी हल्ला करुन आपल्याला जो संदेश दिला की, येथे येऊ नका तर आम्ही म्हणून की आम्ही येथे येणारच काश्मीर आमचा आहे. मोठ्या संख्यने आम्ही येथे येऊ. त्यामुळे लोकांना मी विनंती करतो की, येथे या बुकींग रद्द करु नका. हा एरीया खूपच सेफ आहे, जर आपण इतरत्र जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर तिकडे जाण्याऐवजी इकडे यावे. काश्मीरमध्ये आनंद आणि प्रेम आणणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

काश्मीरमध्ये येण्याची भिती वाटली का?

अतूल कुलकर्णी म्हणाले, काश्मीरमध्ये येण्याची भिती कशाला वाटावी. एवढे सारे जवान येथे आहेत, एक हल्ला झाला त्यातल्या मृतांना आपण श्रद्धांजली अर्पण करुया. आमच्या मनातील भितीला बाहेर काढा आणि या असेही आवाहन त्यांन देशातील पर्यटकांना केले आहे.

अतुल कुलकर्णींची पोस्ट काय आहे?

अतुल कुलकर्णीने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी विमानाच्या तिकिटांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले आहे. चला काश्मीरला जाऊया, असे म्हटले आहे."

चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
कश्मीरियत की बात सुनें
कश्मीरियों की बात बनें
चलिए जी, कश्मीर चलें

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+