Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऐश्वर्या रायला दुसरं अपत्य का नको होते,आराध्याच्या जन्मानंतर काय झालं? अभिषेकने सगळचं सांगितलं...

Aishwarya Rai and Abhishek Bachchan marathi News : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चीली जाणारी जोडी. 2007 मध्ये लग्न झाल्यानंतर या जोडप्याने 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्या बच्चनचे स्वागत केले. त्यानंतर दुसरे अपत्य का झाले नाही किंवा ऐश्वर्या रायने यावर काय भूमिका घेतली, याची नेहमीच मनोरंजन विश्वात चर्चा असते. त्यावर आता अभिषेक बच्चनने खुलासा केला आहे.

अभिषेक-ऐश्वर्याची 13 वर्षांची मुलगी

आराध्या बच्चन 13 वर्षांची आहे आणि तीही तिच्या पालकांप्रमाणेच चर्चेत असते. आराध्याच्या जन्मानंतर, अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांना दुसरं मुलं होऊ देणार का, असा सवाल कायम चर्चीला जातो. तथापि, आतापर्यंत दोघांनीही या संदर्भात कधीही उघडपणे किंवा कोणत्या कार्यक्रमात विधान केलेले नाही, ना कोणताही खुलासा केला.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

रितेशच्या शोमध्ये अभिषेकने केला खुलासा!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये अभिषेक बच्चनला या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली.

अभिषेक बच्चन बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखच्या 'केस तो बंता है' या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यादरम्यान रितेशने त्याला बच्चन कुटुंबाच्या नावांच्या वैशिष्ट्याबद्दल एक मनोरंजक प्रश्न विचारला.

रितेशने म्हटले होते की, बघा, अमिताभ, ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक, त्यांची सर्व नावे 'A' ने सुरू होतात. मग जया आंटी आणि श्वेता दीदींनी काय केले? हे ऐकून अभिषेकला हासू आवरले नाही.

दुसऱ्या अपत्याविषयी प्रश्न विचारताच...!

या कार्यक्रमात पुढे बोलताना, जेव्हा रितेशने विनोदामध्ये म्हटले की, 'आराध्या नंतर' असे विचारले. तेव्हा अभिषेक प्रथम थोडा लाजला आणि नंतर हसत म्हणाला - अरे भाई, पुढची पिढी कधी येईल ते पाहू.

यानंतर, रितेशने म्हटले - रितेश, रायन, राहिल असे कोण इतके दिवस वाट पाहतो. मग अभिषेक हसत त्याला थांबवत म्हणाला - वयाचा आदर कर रितेश, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. आणि त्या प्रश्नाला जागेची मोडले आणि हसण्यावर तो प्रश्न संपविला.

ऐश्वर्या रायला दुसरे अपत्य का नको होते?

दरम्यान, अभिषेक बच्चनला नेहमीच दुसरे मूल हवे होते हे अनेक वेळा समोर आले आहे, परंतु आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या रायने दुसऱ्या बाळाचा प्लॅन केला नव्हता. यावर देखील सातत्याने चर्चा होते.

काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ऐश्वर्या रायला आराध्या ही खूप वर्षानंतर झाली. त्यावेळी तिला गरोदरपणात अनेक गुंतागुंत झाल्या. त्यामुळे तिने दुसऱ्या अपत्याचा विचार केला नाही, असा दावा केला जातोय. परंतु, याबाबत पती-पत्नीने कधीही कोणताही खुलासा केलेला नाही.

मैत्रीमध्ये विनोद आणि हास्य अपरिहार्य

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख हे पडद्याबाहेर चांगले मित्र आहेत. दोघांनी 'ब्लफमास्टर', 'हाऊसफुल' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि चाहत्यांना त्यांच्यातील ही केमिस्ट्री खूप आवडते. यामुळेच लोकांना हा भाग खूप आवडला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+