तिच्याशी लग्न करणं चूक, आमिर खान नेमकं काय अन् कोणाबद्दल बोलून गेला...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या प्रचारादरम्यान आमिरने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला असून, त्याच्या पहिल्या लग्नाविषयी खुलेपणाने मत मांडलं.

Aamir Khan marriage

"लग्नाचा निर्णय लवकर झाला" - आमिर खान

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या आमिरला विचारण्यात आले की, त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक कोणती होती. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "मी अनेक चुका केल्या आहेत, पण त्याच चुकांमुळे मी आज इथे आहे. यश मिळालं कारण मी अपयश आणि चुका अनुभवल्या."

त्याने पुढे स्पष्ट केलं की, "रीना आणि मी खूप लवकर लग्न केलं. तेव्हा मी 21 वर्षांचा होतो आणि ती 18-19 वर्षांची होती. आम्ही एकमेकांना फक्त चार महिन्यांपासून ओळखत होतो आणि त्या काळातदेखील फारसा वेळ एकत्र घालवला नव्हता. त्या वयात आम्ही फार विचार न करता प्रेमात लग्नाचा निर्णय घेतला."

"रीना खूप चांगली होती, पण निर्णय घाईचा होता"

आमिरने हेही नमूद केलं की, "आज मागे वळून पाहताना जाणवतं की लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय इतक्या लवकर घेणं चुकीचं होतं. पण रीनासोबतचा प्रवासही अतिशय सुंदर होता. ती एक उत्कृष्ट व्यक्ती आहे आणि आम्हाला आमची दोन मुलं - जुनैद आणि आयरा - मिळाली. त्यामुळे मी त्या नात्याला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही."

"त्याच अनुभवांमुळे शिकायला मिळालं"

आमिर म्हणतो, "माझ्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, काही चांगल्या, काही कठीण. पण त्या सगळ्या अनुभवांनीच मला घडवलं. माणूस त्याच्या चुका स्वीकारून त्यातून शिकतो. मी जे काही शिकलो, ते अशाच अनुभवांमधूनच."

या प्रामाणिक खुलाशामुळे आमिरने पुन्हा एकदा आपली पारदर्शकता आणि प्रगल्भता दाखवून दिली आहे. त्याचं हे वक्तव्य अनेक तरुणांना नात्यांकडे परिपक्व दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारं ठरू शकतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+