दिव्या भारतीचा घात की अपघात?,मृत्यूच्या आधल्या रात्री काय घडलं, 31 वर्षानंतर झाला मोठा खुलासा
Divya Bharti Death Reason: दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारती म्हणजे सीनेसृष्टीला पडलेलं स्वप्नच आहे. अतिशय कमी कालावधीत दिव्या भारतीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले होते. तर तिच्या सौंदर्याचे प्रेक्षक चाहते होते. परंतु, अचानक तिचा झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टी एका बड्या अभिनेत्रीच्या अभिनयाला मुकला. पण आजही चाहत्यांच्या मनावर तिचे स्थान कायमच आहे. दरम्यान, दिव्या भारतीचा मृत्यू होऊन जवळपास 31 वर्षे झाली पण तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच तिच्यासोबत काम करणाऱ्या को-अॅक्टरने तिच्या मृत्यूच्या आधल्या रात्री काय घडलं होतं, तिचा मृत्यू कसा झाला याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत पुन्हा एका दिव्या भारती यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
दिव्या भारतीचा कधी झाला होता मृत्यू
सिनेसृष्टीला पडलेलं अधुरं स्वप्न म्हणजे दिव्या भारती. दिव्याचा 5 एप्रिल 1993 रोजी मृत्यू झाला. तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला. लहान वयात दिव्या भारतीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. या घटनेला 31 वर्षे उलटून गेली आहेत, मात्र तिचा मृ्त्यू हा खून होता की आत्महत्या हे गूढ अद्यापही कायम आहे.

मृत्यूच्या 31 वर्षांनंतर या अभिनेत्रीने केला खुलासा
दिव्या भारतीसोबत 'शोला और शबनम' या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री गुड्डी मारुतीने एका मुलाखतीत दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. गुड्डी यांनी सांगितले की, दिव्या भारतीने तिच्या मृत्यूपूर्वी एकासोबत लग्न केले होते, पण ती खूप तणावात दिसली होती, असा धक्कादायक खुलासा देखील केला.
'मृत्यूच्या एक दिवस आधी दिव्याने केली पार्टी'
सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवर गेस्ट म्हणून आलेल्या गुड्डी मारुतीने सांगितले - माझा वाढदिवस 4 एप्रिलला होता आणि दिव्याचा मृत्यू 5 एप्रिलला झाला होता. अशा परिस्थितीत, तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, दिव्याने साजिद नाडियाडवाला आणि इतर अनेकांसोबत माझा वाढदिवस एन्जॉय केला होता. दिव्याने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी खूप पार्टी केली होती. मात्र, तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव पाहायला मिळाला होता.
'दिव्या साजिद नाडियाडवालाच्या प्रेमात होती वेडी'
गुड्डी मारुतीने सांगितले- दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण, जेव्हा दिव्याचा मृत्यू झाला तेव्हा साजिदला मोठा धक्का बसला. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी दिव्या भारतीने तिच्यासोबत एक दिवसाने काहीतरी अनुचित घडेल अशी जाणीवही होऊ दिली नाही.
मी विमानतळावर असताना मला बातमी कळाली
गुड्डी मारुतीने सांगितले की ती मुंबई विमानतळावर होती, जेव्हा दिग्दर्शक रत्नाने तिला फ्लाइटमध्ये दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल सांगितले. गुड्डी मारुती म्हणाली- दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी दिग्दर्शकाला सांगितले की परवा आम्ही एकत्र होतो. माझा यावर विश्वास बसत नव्हता. मी त्यावेळी पूर्णपणे सुन्न झाले होते.

अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून दिव्याचा मृत्यू
मुळात दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत अजूनही गुढ कायम आहे. परंतु, वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. दिव्या भारतीच्या मृत्यूच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. बाल्कनीतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि हा अपघात होता यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. तर तिला कोणीतरी ढकलून दिले असावे, तिची हत्या झाली असावी, अशी चर्चा देखील त्या काळात होऊ लागली होती.
मृत्यूपश्चात 31 वर्षांनी धक्कादायक खुलासा
दिव्या भारतीला कोणीतरी बाल्कनीतून ढकलून दिल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. अशा स्थितीत त्यांच्या मृत्यूला हत्या म्हटले जात आहे. पण तिथे काय घडलं, हे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल सदाना यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 31 वर्षांनी लोकांना सांगितले होते. एका मुलाखतीत अभिनेता कमल सदानाने दिव्या भारतीचा मृत्यू हा अपघात असल्याचे स्पष्ट केले होते.
31 वर्षांनंतरी दिव्या भारतीचा अतूट विक्रम कोणता?
बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारतीनं 'निला पन्ने' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा तमिळ भाषेतील चित्रपट होता. यानंतर ती व्यंकटेशसोबत एका चित्रपटातही दिसली. या चित्रपटाचं नाव होतं, 'बोब्ली राजा'. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये हे दोन चित्रपट केल्यानंतर दिव्या भारती हिंदी चित्रपटांमध्ये आली. सुमारे तीन वर्ष तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. या तीन वर्षांत दिव्या भारतीनं साऊथ आणि बॉलिवूडमधील 21 चित्रपटांमध्ये काम केलं. या 21 चित्रपटांपैकी 13 चित्रपट सुपरहिट ठरले. फ्लॉप ठरलेले आठ चित्रपटही बजेट वसूल करण्यात जवळपास यशस्वी ठरले.
एका वर्षांत 12 चित्रपट, दिव्याचा अनब्रेकेबल रेकॉर्ड
विश्वात्मा चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दिव्या भारतीनं 1992 मध्ये 12 चित्रपट केले होते. हादेखील एक रेकॉर्ड आहे. हेच काय, ज्यावेळी दिव्याचा मृत्यू झाला, त्यावेळीसुद्धा तिच्याकडे 12 चित्रपट होते. पण, दिव्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तिचे ते चित्रपट तसेच अधुरे राहिले. यापैकी काही चित्रपट श्रीदेवी, करिश्मा कपूर यांसारख्या अभिनेत्रींनी नंतर पूर्ण केलं.
शवविच्छेदन अहवालात अपघाताचा उल्लेख आहे
दिव्याच्या मृत्यूची बातमी पसरताच काही लोक याला आत्महत्या म्हणत होते. तर काहींनी याला खून म्हटले आहे. या मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण तपास वर्सोवा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये दिव्याचा मृत्यू हा केवळ एक अपघात असल्याचा दावा करण्यात आला होता. खूप दारू प्यायल्यामुळे तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती खिडकीतून पडली. 7 एप्रिल 1993 रोजी मुंबईतील विलेपार्ले येथे दिव्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
पती साजिद नादियाडवालाचे नाव अंडरवर्ल्डशी जोडल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये?
पती साजिद नादियाडवालाचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेल्याच्या बातमीने दिव्या दीर्घकाळापासून दु:खी आणि त्रस्त असल्याचा दावा अनेकांनी केला होता. लग्नानंतर सासू-सासऱ्यांसोबतचे संबंधही खराब झाले. त्यामुळे दिव्या बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. पण दुसरीकडे लोक असेही म्हणत होते की जर दिव्याला आत्महत्या करायची होती तर तिने त्याच दिवशी घराचा सौदा का फायनल केला असता. तिच्या मृत्यूच्या दिवशी सकाळपासूनच ती खूप खूश होती, असे तिच्या भावाने आणि मोलकरणींनी सांगितले होते, त्यानंतर संशयाची व्याप्ती वाढत होती, तेव्हाच दिव्याची हत्या झाल्याचेही इंडस्ट्रीतील काही लोकांनी सांगितले खुनाच्या दृष्टिकोनातून तपास केला असता धक्कादायक खुलासा समोर आला. दिव्याचा खिडकीतून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यात ऑटो-स्टॉपर बसवले नव्हते. उर्वरित इमारतीतील सर्व खिडक्यांना ऑटो-स्टॉपर्स बसवले होते.












Click it and Unblock the Notifications