सैन्यात नोकरी मिळवण्याचे हे आहेत मार्ग, भरती फक्त एक नव्हे तर अनेक पदांसाठी केली जाते
Join Indian Army : भारतीय सेनेत भरती होण्यासाठी देशभरातली लाखो तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. त्यासाठी ते मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा प्रचंड मेहनत करत असतात. तुम्हाला ही इंडियन आर्मीत भरती व्हायचे असेल तर कोणत्या- कोणत्या पदासाठी जागा असतात याची माहिती तुम्हाला असायला हवी.
भारतीय सेनेच्या तिन्ही दलात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भर्ती होत असते. आर्मीमध्ये फक्त एक फौजी किंवा ऑफिसर नव्हे तर काही तांत्रिक पदांसाठी जसे की, डॉक्टर, इंजिनियर पदासाठी कोणीही अर्ज करु शकतात. भारतीय सेना एकूण 3 प्रकारे 12 वी पास उमेदवारांसाठी भर्ती केली जाते. यामध्ये लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एनडीए भर्ती, टेक्निकल एंट्री योजना, लेखी परीक्षांचा समावेश आहे.

दरम्यान पदवीधर उमेदवार देखील शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील होऊ शकतात. 12 वी पास उमेदवारांसाठी आर्मीत भर्ती होण्यासाठी एनडीए हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी लोकसेवा आयोगाच्या मार्फत परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये लेखी परीक्षा एसएसबी मुलाखत आणि ग्राऊंड चाचणी घेतली जाते.
12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
12 वी शिकत असलेले किंवा 12 वी पास झालेले तरुणही तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत सैन्यात सामील होऊ शकतात. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जेईई परीक्षा उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे. भारतीय सैन्य वेळोवेळी तरुणांसाठी क्षेत्रनिहाय भरती मेळाव्या आयोजित करते. यामध्ये, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाते.
डॉक्टर सुध्दया आर्मी जॉईंन करु शकता
भारतीय सशस्त्र दलात डॉक्टर बनण्यास इच्छुक उमेदवार सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMC) द्वारे अर्ज करू शकतात. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांना जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांची आवश्यकता असते. दरवर्षी, भारतीय संरक्षण दल वैद्यकीय कार्यक्रमात प्रवेश घेण्यासाठी व्यावसायिक डॉक्टर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिक्त पदे जाहीर केली जातात.
NEET परीक्षेतील गुणांच्या आधारे फक्त 12 वीच्या उमेदवारांना AFMC वैद्यकीय कार्यक्रमात प्रवेश दिला जातो. सुरक्षा दलांमध्ये भरती दोन प्रकारच्या निवड प्रक्रियेद्वारे केली जाते. शॉर्ट कमिशन आणि परमनंट कमिशन. जे उमेदवार आधीच एमबीबीएस किंवा बीडीएस पदवीधर आहेत. ते भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाने जारी केलेल्या शॉर्ट कमिशन भरतीसाठी देखील अर्ज करू शकतात. तर, दुसरे स्थायी कमिशन अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी नुकतीच पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) हे मुख्य विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.












Click it and Unblock the Notifications