CBSE Supplementary Exam 2025 : सीबीएसई पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी सुरू! परिक्षा कधी होणार? जाणून घ्या
CBSE Supplementary Exam 2025 : दहावी आणि बारावी परिक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. सीबीएसई परिक्षेत विद्यार्थ्यांनी यंदा चांगले गुण घेतले, अनेक जण आता पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची तयारी करत आहे, पण सीबीएसई १०वी आणि १२वीच्या परीक्षेची कधीकधी कठोर परिश्रम करूनही काही विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या गुणांवर त्यांचे समाधान होत नाही, अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी आणि त्यांना आणखी एक संधी देण्यासाठी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुरवणी परीक्षेचा मार्ग मोकळा केला आहे.
सीबीएसईने 2025 मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. 'कंपार्टमेंट'मध्ये आलेले किंवा त्यांचे गुण सुधारू इच्छिणारे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. बोर्डाने पुन्हा एकदा खात्री केली आहे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये आणि ते आत्मविश्वासाने पुढील वर्गात जाऊ शकतील.

या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी
2025 च्या बोर्ड परीक्षेत बसलेले आणि कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झालेले अथवा कमी गुण मिळालेले विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु आता एक किंवा दोन विषयात गुण सुधारू इच्छितात अशा नियमित विद्यार्थ्यांना अर्जासाठी त्यांच्या शाळेशी संपर्क साधावा लागेल, ते स्वतःहून अर्ज करू शकत नाहीत.
पुरवणी परीक्षा कधी होणार?
सीबीएसईने माहिती दिल्यानुसार,पुरवणी परीक्षा 15 जुलै 2025 पासून सुरू होतील. लवकरच वेळापत्रक देखील वेबसाइटवर जाहीर केले जाईल. दहावीचे विद्यार्थी जास्तीत जास्त दोन विषयांमध्ये परीक्षेला बसू शकतात. बारावीचे विद्यार्थी फक्त एकाच विषयात पूरक किंवा सुधारणा परीक्षेला बसू शकतात. फॉर्म भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना विषय निवड आणि वैयक्तिक माहिती अतिशय काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्यात कोणतेही बदल करता येणार नाही.
'या' परिक्षेचे हाॅलतिकीट कधी येईल?
सीबीएसई जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशपत्र जारी करू शकते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी सीबीएसई वेबसाइटला भेट देऊन अपडेट्स तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही.पूरक परीक्षा विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रयत्नाची संधी देते जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचे शिक्षण घेऊ शकतील. हे विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासा आहे जे फक्त एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झाले आहेत किंवा त्यांचा निकाल सुधारू इच्छितात अशांसाठी पुरवणी परीक्षा महत्वाची आहे.












Click it and Unblock the Notifications