जर अर्थसंकल्प सादर झालाच नाही तर देशावर काय परिणाम होतील? जाणून घ्या या 4 गोष्टी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलैला संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
त्यापूर्वी आज 22 जुलैपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये अर्थमंत्री सामान्य अर्थसंकल्प सादर करतील. जर केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादरच केला नाही किंवा तो लोकसभेत मंजूर झाला नाही तर देशावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ? जाणून घेऊया..

दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत हा केंद्रीय अर्थसंकल्प किंवा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. ज्यामध्ये केंद्र सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडला जातो. यासाठी राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार, अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात.
12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान 23 जुलैला मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून खास अपेक्षा असणार आहेत.
संसदेची मंजूरी आवश्यक
देशाचा अर्थसंकल्प हे एक प्रकारचे महत्वाचे वार्षिक आर्थिक विवरण आहे. ज्यामध्ये देशाचा खर्च आणि उत्पन्न हे एकूण 3 विभागांमध्ये दर्शवले जाते. यामध्ये मग, एकत्रित निधी, आकस्मिक निधी आणि सार्वजनिक खाते यांचा प्रामुख्याने समावेश असतो. जर सरकारने संसदेत अर्थसंकल्प सादर केला नाही तर, संचित निधीतून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
संविधानाच्या अनुच्छेद 266 मध्ये एकत्रित निधीची ही तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीनुसार, सरकारला मिळणारा सर्व महसूल, सरकारने घेतलेली सर्व कर्जे आणि सरकारने दिलेल्या कर्जाच्या वसुलीतून मिळालेली रक्कम एकत्रित निधीमध्ये रूपांतरीत केली जाते. सरकारचा एकूण सर्व खर्च हा या एकत्रित निधीतूनच केला जातो. त्यासाठी, संसदेची मंजुरी मिळणे अतिशय आवश्यक आहे. महत्वाची बाब म्हणजे संसदेच्या मंजुरीशिवाय या निधीतून कोणतीही रक्कम काढता येत नाही.
सरकार वाचवण्यासाठी अर्थसंकल्पाची मंजुरी आवश्यक
केंद्र सरकारने संसदेत मांडलेला अर्थसंकल्प मंजूर झाला नाही किंवा त्यांनी अर्थसंकल्प मांडलाच नाही, तर केंद्र सरकार अडचणीत येते. केवळ हा अर्थसंकल्प सादर करणे महत्वाचे नाही तर त्यासोबतच त्याला मंजुरी मिळणे देखील आवश्यक आहे.
- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प जर बहुमताने मंजूर झाला नाही तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष अल्पमतात आल्याचे समोर येते. तसेच, सरकार चालवण्यासाठी पुरेशी सदस्यसंख्या नाही असे ही समजते.
- केंद्र सरकारने लोकसभेतील विश्वासदर्शक ठराव गमावला, असा तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ आहे. असे जर झाले तर संपूर्ण सरकारला राजीनामा द्यावा लागतो. थोडक्यात जेव्हा लोकसभेत वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर होणार नाही, तेव्हा पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतील.
- परंतु, आजपर्यंत आपल्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासात असे कधीच घडले नाही, की केंद्र सरकारने संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर झाला नाही. आजपर्यंत एकाही सरकारने अल्पमतात अर्थसंकल्प मांडलेला नाही. त्यामुळे, यामध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी न मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- देशाचा अर्थसंकल्प हा लोकसभेने मंजूर करणे अतिशय आवश्यक आणि महत्वाचे आहे. कारण, एकप्रकारे वित्त विधेयकच त्यात समाविष्ट आहे. या वित्त विधेयकाला लोकसभेची मंजुरी आवश्यक असते, राज्यसभेची मंजुरी यासाठी आवश्यक नाही.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications