Tariff dispute : टॅरीफ लादल्यानंतर ट्रम्पंना भारताचा मोठा झटका! मोदी सरकारने काय घेतला निणर्य? वाचा
Tariff dispute : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मनमानी टॅरीफ भारतावर लादल्यानंतर भारतानेही आपला पावित्रा घेतला आहे. आज एनडीए सरकारने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेसोबतचाच ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराला स्थगिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त फायनान्सशियल एक्सप्रेसने रिपोर्ट्च्या हवाल्याने दिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादण्याची धमकी दिल्यानंतर भारताने ही धमकी झुगारली आणि रशियाशी तेल व्यापार सुरुच राहील असे ठणकावून सांगितले होते, या धर्तीवर चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% अतिरिक्त कर लादण्याची दुसरी धमकी दिली. त्यानंतरही भारताचे एकही पाऊल मागे हटले नाही, त्यामुळे अखेर ट्रम्प प्रशासनाने भारतासंदर्भात कठोर भूमिका घेत आणखी अतिरिक्त २५ टक्के असा एकूण ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली.

टॅरीफच्या करारावर स्वाक्षरी
दरम्यान, बुधवारी ट्रम्प यांनी टॅरीफसंदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली व भारतावर, हा आदेश २७ ऑगस्टपासून लागू होईल असे म्हटले. यापूर्वी, ३० जुलै रोजीही त्यांनी २५% कर जाहीर केला होता, त्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर एकूण ५०% कर लादला गेला आहे. भारत अमेरिकेच्या अटी मान्य करत नाही तोपर्यंत भारताशी या मुद्द्यावर चर्चा होणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान आज भारताने टॅरीफ आणि व्यापारविषयक एक बैठक घेत मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता अमेरिकेसोबतचा ३.६ अब्ज डॉलरचा करारास भारताने स्थगिती दिली आहे.
काय आहे हा करार?
2021 मध्ये सहा बोईंग पी- आय-८ या सागरी ग्रस्ती विमानांसाठीचा मूळ करार २.४२ अब्ज डाॅलर्सला मजूंर झाला होता. मात्र, महागाईची झळ, पुरवठा साखळीत आलेल्या अडचणी आणि ट्रम्प यांनी लावलेले अव्वाच्या सव्वा टॅरीफमुळे या करारात वाढ झाली आहे.
फायनान्शिअल एक्सप्रेसने संरक्षण सुत्रांच्या हवाल्यानुसार हे वृत्त दिले आहे. त्यानुसार, या प्रकल्पात जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला २५ टक्के टॅरीफ लादल्यानंतर विमान खरेदीची किंमत वाढली, खरेदीचा खर्च भरमसाठ वाढल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या खरेदीला स्थगिती दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
बोईंग खरेदीचा खर्च भरमसाठ वाढल्याने धोरणात्मक मूल्यांकन करण्याचा भारताने निर्णय घेतला आहे. विमानाच्या सुट्या भागाच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. जगातील संघर्षाची स्थिती, स्वायत्तता यासारख्या घटकाचा परिणाम म्हणून स्थगित करण्यात आल्याचे यासंदर्भातील वृत्तामध्ये म्हटले आहे.
असे असले तरी भारत सरकारकडून या करारासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असेही फायनल आपल्या वृत्तात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications