पेन्शनला जर विलंब झाला तर बॅंकाना द्यावा लागेल इतके टक्के व्याज; RBI निर्देशाने बॅंकांचे धाबे दणाणले
RBI's New Rules for Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही दिवसांपूर्वीच पेन्शनबाबत बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. नेमका आरबीआयने काय निर्देश दिलेत त्याबदद्ल जाणून घेऊया...!
आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार आता बॅंकांना पेन्शनधारकांना अधिकचे व्याज द्यावे लागणार आहे. आरबीआयच्या वतीने काढण्यात आलेल्या अधिसूचनेप्रमाणे, जर केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये काही विलंब झाला तर जबाबदार बँकेला वार्षिक 8 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरमध्ये असे म्हटले आहे की या नियमाचा उद्देश पेन्शनधारकांना त्यांच्या थकबाकीच्या विलंबामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करणे हा आहे.

आरबीआयच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
आरबीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, पेन्शन देणाऱ्या बँकांना पेन्शनधारकांना पेन्शनच्या देय तारखेनंतर पेन्शन किंवा थकबाकी जमा करण्यास विलंब झाल्यास दरवर्षी 8 टक्के निश्चित व्याजदराने भरपाई द्यावी लागेल.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, पेन्शनधारकांकडून कोणत्याही दाव्याची आवश्यकता न पडता ही भरपाई आपोआप दिली जाईल. पेन्शन देयकाच्या तारखेनंतर झालेल्या कोणत्याही विलंबाची भरपाई दरवर्षी 8 टक्के निश्चित व्याजदराने करावी.
आरबीआयचा हा नियम कधीपासून लागू होईल?
ज्या दिवशी बँक सुधारित पेन्शन किंवा पेन्शन थकबाकीची प्रक्रिया करेल त्याच दिवशी पेन्शनधारकाच्या खात्यात व्याज जमा केले जाईल. 1 ऑक्टोबर 2008 पासून सर्व विलंबित पेमेंटवर हे व्याज लागू होईल. कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन कोणत्याही विलंबाशिवाय मिळावे यासाठी आरबीआयचा हा नियम देखील लागू करण्यात आला आहे. बँकांना आरबीआयच्या सूचनांची वाट न पाहता पेन्शन पेमेंट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या पेमेंटमध्ये त्यांचे फायदे मिळतील याची खात्री होणार आहे.
बँकांनी ग्राहक सेवा उत्तम द्यावी
आरबीआयने बँकांना चांगली ग्राहक सेवा देण्यास सांगितले आहे. विशेषतः वृद्ध पेन्शनधारकांना साध्या व अतिशय सोप्या संवादाची सुविधा मिळू शकते. परिपत्रकात म्हटले आहे की पेन्शन वितरित करणाऱ्या सर्व एजन्सी बँकांना पेन्शनधारकांना (विशेषतः वृद्ध पेन्शनधारकांना) विचारशील आणि सहानुभूतीपूर्ण ग्राहक सेवा प्रदान करण्याचा सल्ला बॅकांना दिलेला आहे. या निर्णयामुळे पेन्शनधारकांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांच्यासाठी बँकिंगचा अनुभव त्रासदायक होणार नाही.
निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली सेवा मिळेल. या निर्देशामुळे संपूर्ण भारतात पेन्शन वितरणाची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढेल. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे, पेन्शनधारकांना बँकांसोबतच्या त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कमी विलंब आणि चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक हक्क अधिक दृढपणे राखले जातील.












Click it and Unblock the Notifications