Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

निर्मला सीतारामन यांनी केला विक्रम! भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले 'हे' ..घ्या जाणून

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाच्या संसदेत अर्थसंकल्पाचे वाचन करीत आहे. याबरोबरच आज निर्मला सीतारामन यांनी एक विक्रमही केला आहे. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असून त्यांनी माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडला आहे, जाणून घेऊया, निर्मला सीतारामन यांनी आज केलेला विक्रम.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा इतिहास आहे. सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिला महिला अर्थमंत्रीही ठरल्या आहेत.

Nirmala Sitharaman created record

मोरारजी देसाईंचा विक्रम मोडला

मोरारजी देसाई यांनी सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. सीतारामन यांनी आज सातवा अर्थसंकल्प सादर करत मोरारजी देसाईंचा विक्रम मोडला आहे, देसाई यांनी 1959 ते 1964 या काळात अर्थमंत्री म्हणून काम केले आणि पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

पेपरलेस अर्थसंकल्प

अर्थसंकल्प मागील संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणेच पेपरलेस स्वरूपात सादर केला जाईल. 2024 चा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला होता.

काय म्हणाल्या अर्थमंत्री सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि सलग तिस-या वेळी संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार त्यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण असतानाही भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा त्यांनी केला.

अन्नपदार्थ वगळता अन्य वस्तूंची महागाई थोपवण्यात यश आल्याचेही दावा केला आहे. तसेच सरकारची गरीब कल्याण योजना वैशिष्टय़पूर्ण असून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. या योजनेला मुदतवाढ मिळणार असून गरिबांचे कल्याण हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+