Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण इस्त्रायल संघर्षामुळे भारतात पेट्रोल -डिझेलचे दर वाढतील का? वाचा पेट्रोलीयम मंत्री काय म्हणाले?

Iran Israel war Will petrol and diesel prices increase in India : मध्य पूर्व भागात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक परिस्थिती स्फोटक बनू पाहत आहे. यातच २२ जून रोजी अमेरिकेने इराण आणि इस्त्रायल संघर्षात तेल ओतले. ज्यामुळे जागतिक शांततेत आगीचा भडका झाला. अमेरिकेने हल्ला करुन इराणचे अणूस्थळ नेस्तनाबूत केले आहे असा युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे.

अशा स्थितीत तेलाचा प्रमुख निर्यातदार देश असलेल्या इराणवर अनेक राष्ट्र अवलंबून आहे. मध्य पूर्व भागातील होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाद्वारे केल्या जाणाऱ्या तेल वाहतुकीवर युद्धाचे ढग आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत आणि आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा राहतील याचा अंदाज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे.

Iran Israel war Will petrol and diesel prices increase in India

एनआयशी बोलताना मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इस्रायल-इराण युद्धामुळे भारतीय ग्राहकांना तेल पुरवठ्यात अडथळा येण्याची आणि अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावात आणखी वाढ होण्याची भीती फारशी नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी जरी हे वक्तव्य केले असले तरीही आगामी काळातील युद्धजन्य स्थितीमुळे नेमके काय होईल हे अद्याप सांगता येत नाही.

Take a Poll

इस्रायल-इराण संघर्षावर काय म्हणाले हरदीपसिंग पुरी?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, "... आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता, मध्य पूर्वेतील तणाव वाढणे पूर्णपणे अनपेक्षित नव्हते. आम्ही याची पूर्वसूचना दिली होती. आम्ही ही गोष्ट जाणून आहोत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार, होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता यासह परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहे..

भारतीय तेल कंपन्यांकडे किती आहे साठा?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, आम्ही पुरवठ्याचे स्रोत विविध केले आहेत. भारत दररोज वापरत असलेल्या ५.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी सुमारे १.५-२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा वापर होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. आम्ही इतर मार्गांनी सुमारे ४ दशलक्ष बॅरल आयात करतो. आमच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे. त्यापैकी बहुतेकांकडे तीन आठवड्यांपर्यंतचा साठा आहे. त्यापैकी एका मार्गाने २५ दिवसांचा साठा उपलब्ध आहे.
आम्ही इतर मार्गांनी कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवू शकतो...

चिंता करण्याचे कारण आहे का?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, आम्ही सर्व संभाव्य घटकांशी संपर्कात आहोत... या पातळीवर कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही. आम्ही उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि पंतप्रधानांनी आधीच सर्व प्रमुख नेत्यांशी बोलणी केली आहेत. त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी तणाव कमी करण्याचे आवाहन करून दीर्घ चर्चा केली आहे. ही आमची आशा आहे. आम्ही सर्वजण परिस्थिती आणखी चिघळण्याऐवजी शांत होईल आणि तणाव कमी होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आम्ही विकसित होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत..."

नागरिकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न

हरदीप पुरी यांनी स्पष्टता दिली की, देशातील तेल विपणन कंपन्या (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) अनेक आठवड्यांपासून पुरवठा करत आहेत आणि अनेक मार्गांवरून ऊर्जा पुरवठा करत आहेत. "आम्ही आमच्या नागरिकांना इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू," असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

येमेनचे बंडखोर करु शकतात जहाजांवर हल्ला

मध्य पूर्वेतील व्यापक संघर्षाचा सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि युएई येथून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होईल. येमेनच्या हुथी बंडखोरांनी आधीच इशारा दिला आहे की जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर ते जहाजांवर पुन्हा हल्ले सुरू करतील, त्यामुळे जहाजांनाही फटका बसू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+