2 कोटींपर्यंत कर्जची योजना आणली! त्यासाठी गॅरंटीची गरज नाही - PM मोदी बजेटवर अजून काय म्हणाले? वाचा
Budget 2025 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी शेतकरी, महिला, कृषी, युवा, उद्योग, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आणि तरतूदही केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर आपले भाषण आज दिले.
सरकार श्रमाची पुजा करतेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, श्रमाची पुजा हे सरकार करतेय, हे बजेट देशाच्या गरजेसोबतच भविष्याच्या तयारीसाठी मदत करत आहे. स्टार्टअप,अणूऊर्जा मिशनसाठी ही महत्वाचे आहे. हे ऐतिहासिक बजेट आहे.

मध्यमवर्गाला अर्थंसकल्पातून मोठा फायदा
ग्रामीण अर्थव्यवस्थेला अर्थसंकल्पातून आधार मिळत आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढल्याने मोठी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केले आहे. याचा मोठा फायदा मध्यमवर्ग आणि नोकरदारांना होणार आहे. इनकम टॅक्सची मुक्ती एक संधी नवीन नोकरदारांना आहे. छोट्या उत्पादक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. लक्ष नितळ आहे की, भारतीय उत्पादन जगात पोहचावे. एमएसएमई आणि स्टार्टअपचे क्रडिट दुप्पट केले जात आहे. नवीन उद्योजकांसाठी दोन कोटींपर्यंत कर्जाची योजना आणली गेली आहे, त्यासाठी गॅरंटीची गरज नाही.
आत्मनिर्भर भारताला हा अर्थसंकल्प गती देणार
आत्मनिर्भर भारताला हा अर्थसंकल्प गती देणार आहे. पर्यटन क्षेत्राला या अर्थसंकल्पाने बळ दिले असून रोजगाराला यातून चालना मिळणार आहे. चहुबाजूने रोजगाराला संधी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केला. देश आज विकास आणि वारसा घेऊन चालत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली गेली आहे.
अर्थसंकल्पावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे. हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणता येईल, विशेषतः मध्यमवर्गासाठी. त्यांनी असा अर्थसंकल्प सादर केला, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. आयकर सूट स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे आणि आयकर सूट 12 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा भारताच्या अर्थव्यवस्थेत एक मैलाचा दगड ठरेल... यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातात खर्च करण्यायोग्य उत्पन्न येईल, खरेदी होईल, मागणी वाढेल आणि एमएसएमईला फायदा होईल, रोजगार निर्माण होईल.
परिणामी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येईल. कृषी क्षेत्रात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत... आज अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मला वाटते की हा एकवीसाव्या शतकात एक पथदर्शी अर्थसंकल्प आहे. हा एक नवीन मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.












Click it and Unblock the Notifications