बजेट 2024 : शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत देशाचा अर्थसंकल्प केला. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की या अर्थसंकल्पात 9 गोष्टींना प्राधान्य असून यावर सतत लक्ष केंद्रित केले जाईल, भविष्यातील अर्थसंकल्प 2024 च्या 9 प्राधान्यांवर आधारित असेल.
अर्थमंत्र्यांनी मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात महिला आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू करताना सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्था अजूनही धोरणात्मक अनिश्चिततेच्या कचाट्यात आहे, तर भारताची वाढ जगभरात गतीने होत आहे आणि येत्या काही वर्षांतही तशीच राहील.
गरीब, शेतकरी, तरुणांवर लक्ष केंद्रित करणार
अर्थमंत्री म्हणाल्या की, अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली, ज्याचा 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर भर असेल, शिक्षण, रोजगार, कौशल्य यासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील 9 प्राधान्यक्रम
अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की या अर्थसंकल्पात 9 प्राधान्यांवर सतत लक्ष केंद्रित केले जाईल, भविष्यातील अर्थसंकल्प 2024 च्या 9 प्राधान्यांवर आधारित असेल.
- शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
- रोजगार आणि कौशल्ये
- उत्तम मानव संसाधन, सामाजिक न्याय
- उत्पादन आणि सेवा
- शहर विकास, नागरी विकास
- ऊर्जा सुरक्षा
- पायाभूत सुविधा
- नवोपक्रम, संशोधन आणि विकास
- पुढच्या पिढीतील सुधारणा
कृषी क्षेत्रासाठी मोठी घोषणा
सरकार कृषी संशोधनाचा सर्वसमावेशक आढावा घेणार आहे, कृषी क्षेत्रात हवामानाला अनुकूल वाण विकसित करण्यावर भर देणार आहे. तसेच नवीन 109 उच्च उत्पादन देणाऱ्या, हवामानास अनुकूल वाण शेतकऱ्यांसाठी मिळणार आहेत.
- 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीत सामावून घेतले जाईल
- 10,000 आधारित बायो-इनपुट केंद्रे उभारण्याची गरज आहे
- तेलबियांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण व्यवस्था मजबूत केली जाईल.












Click it and Unblock the Notifications