मुकेश अंबानींकडून धाकट्या मुलावर कौतुकाचा वर्षाव; अनंत अंबानींना दिली 5 वर्षांसाठी ही मोठी जबाबदारी!

Anant Ambani as Executive Director, Reliance Industries, Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या धाकट्या मुलावर जाम खूश आहेत. त्यांनी अनंत अंबानींना कंपनीत पुढील पाच वर्षांसाठी सर्वात मोठी जबाबदारी दिली आहे.

धाकट्या मुलाची कौशल्यता व व्यवसाय हाताळण्याच्या पद्धतीवर खूश होऊन त्यांनी ही नवीन जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. चला तर जाणून घेऊया कंपनीत काय बदल झाला असून अनंत यांच्याकडे नेमकी काय जबाबदारी देण्यात आली.

तुमच्या माहितीस्तव, मुळातच मुकेश अंबानी यांनी सन 2022 मध्ये त्यांच्या तीन मुलांमध्ये कंपनीच्या विविध व्यवसायांची जबाबदारी विभागली होती. मुलगी ईशा अंबानी यांना रिटेलची जबाबदारी देण्यात आली, मोठा मुलगा आकाश अंबानी यांना टेलिकॉमची जबाबदारी देण्यात आली. तर धाकटा मुलगा अनंत अंबानी यांना ऊर्जा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. पण अलिकडेच मुकेश अंबानी यांनी खूश होत अनंत अंबानींवर नवीन जबाबदारी सोपवली आहे, ती देखील तब्बल पाच वर्षांच्या कालावधीसाठी.

Anant Ambani

अनंत यांना काय मिळाली नवीन जबाबदारी?

मिळालेल्या माहितीनुसार, आता कंपनीने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने 1 मे 2025 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून अनंत मुकेश अंबानी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. आतापर्यंत ते कंपनीशी गैर-कार्यकारी संचालक म्हणून संबंधित होते.

अनंत अंबानी मार्च 2020 पासून जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या बोर्डवर आहेत. मे 2022 पासून त्यांनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डातही योगदान देण्यास सुरुवात केली. याशिवाय, ते जून 2021 पासून रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडच्या बोर्डवर आहेत. सप्टेंबर 2022 पासून, ते ग्रुपची परोपकारी शाखा असलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या बोर्डावर देखील कार्यरत आहेत.

मुकेश अंबांनी यांनी धाकट्या मुलाचे केले कौतुक

ब्राउन विद्यापीठातून पदवीधर झालेल्या अनंत यांना कंपनीच्या अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये नेतृत्वाचा अनुभव मिळाला गाठीशी आला आहे. त्यामुळे मुकेश अंबांनी यांनी त्यांच्यावर नवीन जबाबदारी दिली आहे. विशेष बाब म्हणजे, हा निर्णय अंबानी कुटुंबाच्या उत्तराधिकार योजनेचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत पुढील पिढीकडे धोरणात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. एजीएममध्येही मुकेश अंबानी यांनी अनंत यांच्या नेतृत्व क्षमतेचे आणि ऊर्जा क्षेत्राबद्दलच्या त्यांच्या समजुतीचे कौतुक केले होते.

रिलायन्सने रचला नवा इतिहास!

जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीचे निकाल जाहीर करून आरआयएलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी बनली आहे, जिची एकूण इक्विटी ₹ 10 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

डिजिटल सेवांमधून विक्रमी कमाई

कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्सच्या डिजिटल सेवांनी तिमाहीत विक्रमी महसूल आणि नफा मिळवला. वापरकर्त्यांची चांगली गुंतवणूक आणि मजबूत ग्राहक मिश्रणामुळे कमाई वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+